'सेक्रेड गेम्स'चा ट्रेलर प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

नेटफ्लिक्‍सची पहिली ओरजिनल इंडियन वेबसीरिज म्हणून सेक्रेड गेम्स या वेबसीरिजची घोषणा करण्यात आली होती. आता ही वेबसीरिज 6 जुलैपासून नेटफ्लिक्‍सवर प्रदर्शित होणार आहे. सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे, सुरवीन चावला अशी तगडी कास्ट या वेबसीरिजमध्ये आहे.

अनुराग कश्‍यप आणि आदित्य मोटवानी यांनी या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे. 2006 मध्ये आलेल्या विक्रम चंद्रा यांच्या सेक्रेड गेम्स या गाजलेल्या कादंबरीवर ही वेबसीरिज आधारित आहे. या वेबसीरिजमध्ये सैफ अली खान मुंबई पोलिस ऑफिसर सरताज सिंगची भूमिका करतोय जो एका पॉवरफुल क्रिमिनल गायतोंडेच्या (नवाजुद्दीन सिद्दीकी) मागावर आहे. गायतोंडे सरताजला फोन करून सगळे मरतील आणि तुला तुझ्या शहराला वाचवण्यासाठी फक्त २५ दिवस आहेत असे सांगतो. ही गोष्ट सरताज रॉ अॅनॅलिस्ट अंजली माथुरला (राधिका आपटे) सांगतो. त्यानंतर त्याच्या बाबतीत काही गोष्टी घडतात आणि त्याला सस्पेंड केले जाते. त्यानंतर सरताज मुंबईला कसं वाचवतो ही कथा सेक्रेड गेम्स या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. नेटफ्लिक्‍सची ही पहिली भारतीय वेबसीरिज आहे आणि तीही हिंदीमध्ये, त्यामुळे डिजिटल कंटेंट पाहणाऱ्यांच्या उड्या नक्कीच त्यावर पडतील. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trailer published of sacred games