'लव्हरात्री'चा ट्रेलर रिलीज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

'लव्हरात्री- यह कहानी है प्यार और मोहब्बत की' असं कॅप्शन देत सलमाननं ट्विट केलं आहे.

मुंबई : 'लव्हरात्री' सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आहे. अभिनेता सलमान खानने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन हा ट्रेलर शेअर केला आहे. सलमानचा मेहुणा म्हणजे बहिण अर्पिताचा पती आयुष शर्मा आणि अभिनेत्री वरिना हुसैन 'लव्हरात्री'तून बॉलिवूड डेब्यू करत आहेत.
 

loveratri

'लव्हरात्री- यह कहानी है प्यार और मोहब्बत की' असं कॅप्शन देत सलमाननं ट्विट केलं आहे. 'लव्हरात्री'ची निर्मिती सलमान खान फिल्मच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. सिनेमात राम कपूर, रॉनित रॉय यांच्याही भुमिका आहेत. 
 

सिनेमाचं दिग्दर्शन अभिराज मिनावाला यांनी केलं आहे. अभिराजने पहिल्यांदा दिग्दर्शन केले आहे. गुजराती संस्कृती सिनेमात दाखविण्यात आली आहे. 5 ऑक्टोबरला 'लव्हरात्री' प्रदर्शित होणार आहे.  

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trailer Release of Loveratri Movie