#SaahoTrailerDay प्रभासच्या 'साहो' ट्रेलरची देशभरात उत्सुकता

टीम ईसकाळ
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

साहोच्या ट्रेलरची उत्सुकता देशभरात शिगेला पोहोचली आहे. इतकेच नव्हे तर सकाळपासून #SaahoTrailerDay हा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंडिंग आहे. 

दक्षिणेतील अभिनेता प्रभास आणि बॉलिवूडची क्यूट गर्ल श्रध्दा कपूर अभिनित 'साहो' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर आज संध्याकाळी 5 वाजता लॉन्च होणार आहे. त्यामुळे या ट्रेलरची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. इतकेच नव्हे तर सकाळपासून #SaahoTrailerDay हा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंडिंग आहे. 

 

 

'बाहुबली' नंतर प्रभास हा 'साहो' च्या शूटींगमध्ये व्यस्त झाला, तेव्हापासूनच या चित्रपटाची चर्चा होती. या चित्रपटाच्या टीझरलाही चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात अॅक्शनचा धमाका बघायला मिळेल. गन्स आणि गाड्यांसोबत प्रभास जबरदस्त अॅक्शन करताना दिसेल. प्रभास हा एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे. त्याचसोबत नील नितीन मुकेश, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांचीही टीझरमध्ये झलक आहे. प्रभास आणि श्रध्दा पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र काम करताना दिसतील.

 

 

 

या चित्रपटातील अॅक्शन सीनसाठी हॉलिवूडमधील 50 लोकांची टीम भारतात बोलाविण्यात आली होती. या टीमने प्रभासला चित्रपटातील अॅक्शन सीनसाठी प्रशिक्षण दिले. चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत यांनी केले आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. '2.0' आणि 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' नंतर तिसऱ्या क्रमांकावर भारतातील सर्वात जास्त बजेट असलेला 'साहो' चित्रपट आहे. 300 करोड एवढे 'साहो'चे बजेट आहे. येत्या 15 ऑगस्टला 'साहो' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trailer of Saaho movie will release today