#ThugsOfHindostanTrailer : बहुचर्चित 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चा ट्रेलर प्रदर्शित

गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

ईस्ट इंडिया कंपनीच्या गुलामगिरीला हूल देणारा 'आझाद' (अमिताभ बच्चन) व कंपनीला फितुर असणारा अतरंगी भूमिकेतील 'मल्लाह फिरंगी' (आमीर खान) यांचे द्वंद 'ठग्स'मधून पाहायला मिळेल. 'दंगल' मधून प्रकाशझोतात आलेली फातिमा सना शेख या चित्रपटात योद्ध्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर कतरिना कैफ सुरैय्याच्या भूमिकेत पुन्हा एकदा आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करण्यास सज्ज आहे. ​

बिग बी अमिताभ बच्चन, परफेक्शनिस्ट आमीर खान, फातिमा सना शेख, कतरिना कैफ अशा दिग्गज स्टारकास्टसह 8 नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या बहुचर्चित 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. 1795 मधील भारत, त्यावर ईस्ट इंडिया कंपनीने केलेले आक्रमण, भारतात व्यापार वाढवण्याचा प्रयत्न व त्यांची गुलामगिरी उधळून लावणारे जिगरबाज योद्धे यांच्यावर 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये भाष्य करण्यात आले आहे.  

ईस्ट इंडिया कंपनीच्या गुलामगिरीला हूल देणारा 'आझाद' (अमिताभ बच्चन) व कंपनीला फितुर असणारा अतरंगी भूमिकेतील 'मल्लाह फिरंगी' (आमीर खान) यांचे द्वंद 'ठग्स'मधून पाहायला मिळेल. 'दंगल' मधून प्रकाशझोतात आलेली फातिमा सना शेख या चित्रपटात योद्ध्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर कतरिना कैफ सुरैय्याच्या भूमिकेत पुन्हा एकदा आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करण्यास सज्ज आहे. 

'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट फिलिप मेडोस टेलर यांच्या 'कन्फेशन्स ऑफ अ ठग अँण्ड द कल्ट ऑफ द ठगी' या कादंबरीवर आधारित आहे. गेल्याच आठवड्यात यातील सर्व प्रमुख व्यक्तिरेखांची ओळख सोशल मीडियावर करून देण्यात आली होती. यातील व्यक्तिरेखांची तुलना ही 'पायरेट्स ऑफ कॅरेबियन' या चित्रपटातील व्यक्तिरेखांशी केली जात आहे. आमीर खानची फिरंगी ही व्यक्तिरेखा व पायरेट्समधील जॅक स्पॅरो या व्यक्तिरेखांमध्ये बरेचसे साधर्म्य आहे. लॉयड ओवेन हा खलनायकाच्या भूमिकेमध्ये दिसणार असून तो ईस्ट इंडिया कंपनीच्या एका अधिकाऱ्याची भूमिका करणार आहे.

हिंदीसह तमीळ आणि तेलगू भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. टीझर व पोस्टर्स पाहून या चित्रपटाबाबत कुतूहल वाढले होते. आज ट्रेलर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trailer of thugs of hindosthan released