तृप्ती देसाई मराठी बिगबॉसमध्ये? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

लोकप्रिय वादग्रस्त शो हिंदी बिग बॉसप्रमाणेच मराठी बिग बॉसदेखील चर्चेमध्ये आहे. या बिग बॉसमध्ये कोण असणार आहे याविषयी संपूर्ण चर्चा रंगत आहे. अशा या चर्चेमध्ये भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांचे नाव असल्याची माहिती सूत्राच्यावतीने कळत आहे.

मंदिर, दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी तृप्ती यांनी लढा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेवरून सामाजिक वादासाठी अनेक वाददेखील निर्माण झाले आहे. आणि हा शो देखील वाद आणि वादग्रस्त व्यक्ती असे समीकरण आहे. अशा या समीकरणामध्ये तृप्ती यांची दाट भूमिका असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यांचे या शोमध्ये असणे कार्यक्रमाला नक्कीच फायदेशीर ठरेल. यापूर्वीदेखील हिंदी बिग बॉसमध्ये त्या झळकणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी ऑफर आली होती मात्र ती नाकारली असे सांगितले होते. आता मातृभाषेतच हा शो असल्यामुळे त्या या कार्यक्रमात झळकणार का यासाठी प्रेक्षकांनी थोडी प्रतिक्षा करावी लागणार? 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Tripti Desais entry chances in Big Boss Marathi

टॅग्स