'त्याच्या' मृत्यूनंतर संजय दत्तच्या मुलीने लिहिली भावनिक पोस्ट 

वृत्तसंस्था
Thursday, 4 July 2019

संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त ही सध्या एका मोठ्या दुःखाला तोंड देत आहे. तिच्या बॉयफ्रेंडच्या अचानक निधानाने तिला धक्का बसला आहे.

संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त ही सध्या एका मोठ्या दुःखाला तोंड देत आहे. तिच्या बॉयफ्रेंडच्या अचानक निधानाने तिला धक्का बसला आहे. 2 जुलैला त्रिशालाच्या इटालियन बॉयफ्रेंडचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्रिशालाला सावरणे कठीण झाले आहे. तिने इन्स्टावर फोटो आणि पोस्ट शेअर करत तिच्या दुःखाला वाट करू दिली आहे. 

त्रिशालाने, 'माझं मन तुटलंय. माझ्यावर प्रेम करण्यासाठी, माझी काळजी घेण्यासाठी आभार. मला तू आनंद दिलास. तुला भेटल्यामुळे मी जगातील भाग्यशाली मुलगी ठरली आहे. तू कायम माझ्यात जिवंत असशील. मी पुन्हा तुला भेटत नाही, तोपर्यंत तुला मिस करत राहीन. तुझीच बेला मिया...' असे लिहिले आहे. 

त्रिशालाच्या बॉयफ्रेंडचा मृत्यू कसा झाला, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. तिने यापूर्वी ती एका इटालियन मुलाला डेट करत असल्याचे सांगितले होते. त्रिशाला ही संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्मा हिची मुलगी आहे. ती फॅश इंडस्ट्रीमध्ये काम करते.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trishala dutta writes emotional post for her boyfriend