माझ्या नवऱ्याची बायकोला धक्का देत 'ही' मालिका क्रमांक एकवर

वृत्तसंस्था
Thursday, 4 July 2019

गेल्या आठवड्यातील रेटिंग्ज आल्या असून गेल्या आठवड्यात आज्या आणि शितलीच्या लागिर झालं जी या मालिकेला टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळालं आहे. लागिर झालं जी ही मालिका आता बंद झाली असली तरी गेल्या आठवड्यात बंद होताना तिचे टीआरपी रेटिंग हे क्रमांक एकचे होते.

मुंबई: प्रेक्षकांना दर आठवड्याच्या टीआरपी रेटिंगबद्दल उत्सुकता असते. या वेळी या रेटिंगनं एक धक्का दिलाय. गेल्या आठवड्यातील रेटिंग्ज आल्या असून गेल्या आठवड्यात आज्या आणि शितलीच्या लागिर झालं जी या मालिकेला टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळालं आहे. लागिर झालं जी ही मालिका आता बंद झाली असली तरी गेल्या आठवड्यात बंद होताना तिचे टीआरपी रेटिंग हे क्रमांक एकचे होते.

टीआरपी रेटिंग्ज दर आठवड्याला येतात. याही वेळी पहिल्या पाचात झी मराठीच आहे. बिग बाॅस मराठी, जिवलगा यांची एंट्री अजून झालेली नाही. नेहमी पहिल्या स्थानावर असलेली माझ्या नवऱ्याची बायको मालिका यावेळी मात्र दुसऱ्या नंबरवर आलीय. पण लागिर झालं जी मालिकेचे फॅन्स वाढल्यानं माझ्या नवऱ्याची बायको दुसऱ्या स्थानावर पोचली.

No photo description available.

लागीरं झालं जी मालिकेचा शेवटचा आठवडा कमालीचा यशस्वी ठरला आहे. कधीही पहिल्या पाचात नसलेली ही मालिका संपता संपता नंबर वन ठरली. प्रेक्षकांनी अज्या-शीतलीला इमोशनल होत निरोप दिला आणि ती जास्त बघितली गेली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Trp rating Lagir Zala jee becomes no 1 serial on zee marathi