TJMM Box Office Collection: रणबीर-श्रद्धाच्या जोडीची बॉक्स ऑफिसवरही धमाल! पहिल्याच दिवशी चित्रपटाने केली एवढी कमाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ranbir kapoor and shraddha kapoor

TJMM Box Office Collection: रणबीर-श्रद्धाच्या जोडीची बॉक्स ऑफिसवरही धमाल! पहिल्याच दिवशी चित्रपटाने केली एवढी कमाई

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. होळीच्या सणावर शक्ती कपूरच्या लाडक्या मुलीसोबत रणबीर कपूरची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे.

हे दोन्ही स्टार्स एकदाही एकत्र दिसले नाहीत. अशा परिस्थितीत, थिएटरमध्ये त्यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक दिसत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी चाहत्यांना खूप आवडते. या जोडीने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. तू झुठी मैं मक्कारला होळीच्या सणाचा खूप फायदा झाला आहे.

बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास 14 कोटींचा व्यवसाय केला आहे. जे वीकेंडला वाढणार आहे.

श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरच्या या चित्रपटाचे वर्णन एक मजेदार रोमँटिक ड्रामा चित्रपट म्हणून केले जात आहे. या चित्रपटात रणबीर कपूरने केवळ अॅक्शन, ड्रामा, रोमान्स दाखवला नाही तर अनेक भावनिक दृश्ये चित्रित करून रणबीरने चाहत्यांना वेड लावले आहे.

कोविडनंतरचा हा पहिलाच चित्रपट आहे ज्यामध्ये श्रद्धा कपूर दिसली आहे. त्यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

लव रंजन मजेदार रोमँटिक ड्रामा चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा हा चित्रपट जवळपास 95 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला आहे. श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांच्या चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.