TJMM Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'तू झुठी मैं मक्कार'ची पकड कायम, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ranbir kapoor and shraddha kapoor

TJMM Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'तू झुठी मैं मक्कार'ची पकड कायम, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

रणबीर कपूर स्टारर चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार' होळीच्या दिवशी म्हणजेच 8 मार्च रोजी रिलीज झाला. नव्या युगातील प्रेमाची कथा दाखवणारा हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे आणि चांगली कमाईही करत आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला मोठी पसंती मिळाली.

दुस-या दिवशी कमाईत थोडीशी घट झाली असली तरी चित्रपटाने चांगले कलेक्शन केले. तिसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई केली ते येथे जाणून घेऊया

लव रंजन दिग्दर्शित 'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटात रणबीर आणि श्रद्धाने पहिल्यांदा एकत्र काम केले आहे. दोघांची जोडी पडद्यावर खूपच फ्रेश दिसत आहे आणि त्यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. कमाईबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 15.73 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

दुसरीकडे, 'तू झुठी मैं मक्कार'ने दुसऱ्या दिवशी 10.34 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाच्या तिसर्‍या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडेही आले आहेत. प्रसिद्ध व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर 'तू झुठी में मक्कार'च्या पहिल्या शुक्रवारच्या कलेक्शनचे आकडे शेअर केले आहेत. 'तू झुठी मैं मक्कार'ने तिसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 10.52 कोटी रुपयांची कमाई केली. यासह एकूण कलेक्शन 36.59 कोटी रुपये झाले आहे.

'तू झुठी मैं मक्कार'ची कमाई आता वीकेंडला वाढण्याची अपेक्षा आहे. शनिवार आणि रविवारी चित्रपटगृहात जास्तीत जास्त प्रेक्षक मिळतील अशी अपेक्षा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाची कमाईही वाढणार हे उघड आहे.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर व्यतिरिक्त डिंपल कपाडिया, अनुभव सिंह बस्सी आणि बोनी कपूर यांनीही 'तू झूठी मैं मक्कार'मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.