Box Office Collection: 'तू झुठी मैं मक्कार'चा बॉक्स ऑफिसवर डंका, शनिवारी झाली बंपर कमाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ranbir kapoor and shradhha kapoor

Box Office Collection: 'तू झुठी मैं मक्कार'चा बॉक्स ऑफिसवर डंका, शनिवारी झाली बंपर कमाई

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर चित्रपट 'तू झूठी मैं मक्कार' बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

शनिवारीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या दिवशी जवळपास 13 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट 8 मार्चला होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. गुरुवारी आणि शुक्रवारी चित्रपटाला थोडा घसरणीचा सामना करावा लागला. मात्र आता शनिवारी त्यात एक झेप पाहायला मिळाली.

शुक्रवारी या चित्रपटाचे कलेक्शन 8.75 कोटी होते. सुरुवातीच्या अंदाजानुसार, बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉम नुसार शनिवारचे कलेक्शन सुमारे 13.5 कोटी असण्याची अपेक्षा आहे. तिसर्‍या दिवसापर्यंत, चित्रपटाने एकूण 31.75 कोटींचा गल्ला जमवला होता, पण शनिवारचा आकडा जोडला तर 'तू झूठी मैं मक्कार' 50 कोटींच्या जवळ पोहोचला आहे.

'तू झूठी मैं मक्कार' हा लव रंजन दिग्दर्शित आहे आणि त्यात डिंपल कपाडिया, बोनी कपूर यांच्याही भूमिका आहेत.