TJMM Box Office Collection: सोमवारी 'तू झुठी मैं मक्कार' सिनेमाच्या कमाईत मोठी घट, फक्त इतक्या कोटींची कमाई... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ranbir kapoor and shraddha kapoor

TJMM Box Office Collection: सोमवारी 'तू झुठी मैं मक्कार' सिनेमाच्या कमाईत मोठी घट, फक्त इतक्या कोटींची कमाई...

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर लव रंजनच्या रोमँटिक-कॉमेडीने आपल्या गाण्यांनी आणि चांगल्या कथेने सर्वांना वेड लावले आहे. बॉलिवूडने यापूर्वी असा रोमँटिक कॉमेडी चित्रपट बनवला नव्हता.

या चित्रपटाच्या कलेक्शनवरून हे स्पष्ट झाले आहे की याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून पहिल्या वीकेंडच्या तिकीट खिडकीवरही चित्रपटाने चांगली कामगिरी केली आणि चित्रपट 50 कोटींचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला. चला जाणून घेऊया चित्रपटाने सोमवारी किती कलेक्शन केले.

'तू झुठी मैं मक्कार' ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. लव रंजन दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर आणि श्रद्धा कपूरची फ्रेश जोडी खूप पसंत केली जात आहे. दुसरीकडे कमाईबद्दल बोलायचे झाले तर 'तू झुठी मैं मक्कार'चा पहिला वीकेंड खूप चांगला होता, मात्र सहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत बरीच घट झाली आहे. रिलीजच्या 6 दिवसांत या चित्रपटाने इतकी कमाई केली आहे.

या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.73 कोटींचा व्यवसाय केला.

तू झुठी मैं मक्कारने रिलीजच्या 2 व्या दिवशी 10.34 कोटी रुपये कमवले

चित्रपटाचे तिसऱ्या दिवशीचे कलेक्शन 10.52 कोटी रुपये होते.

पहिल्या शनिवारी म्हणजेच चौथ्या दिवशी 16.57 कोटी कमावले.

तू झुठी मैं मक्कारने रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजे रविवारी 17.08 कोटी रुपयांची कमाई केली.

सहाव्या दिवशी चित्रपटाच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, 'तू झुठी मैं मक्कार'ने सोमवारी 6.00 कोटींची कमाई केली.

यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 76.24 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

अनुभव सिंग बस्सी, डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

चित्रपटाचे संगीत प्रीतम यांनी दिले असून सर्व गाणी अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिली आहेत. रणबीर लवकरच रश्मिका मंदान्नासोबत 'अ‍ॅनिमल'मध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, श्रद्धा कपूर लवकरच 'स्त्री 2'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.