Tu Jhoothi Main Makkaar: चाहत्यांची रणबीर-श्रद्धाच्या चित्रपटाला पसंती, 5 दिवसांत पार केला 70 कोटींचा टप्पा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ranbir kapoor shraddha kapoor

Tu Jhoothi Main Makkaar: चाहत्यांची रणबीर-श्रद्धाच्या चित्रपटाला पसंती, 5 दिवसांत पार केला 70 कोटींचा टप्पा

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर नेहमीच रोमँटिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने रसिकांना प्रभावित केले आहे. अभिनेत्यांना वर्षभरात कमी चित्रपट करायला आवडतात पण जेव्हा तो एखाद्या चित्रपटात काम करतो तेव्हा तो मन लावून काम करतो.

अभिनेता रणबीर कपूरचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट तू झुठी मैं मक्कार बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाच्या कमाईचे लेटेस्ट आकडे समोर आले असून या आठवड्यात चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल असे दिसते.

पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने 15 कोटींची कमाई केली. यानंतर चित्रपटाने दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी 10-10 कोटींची कमाई केली आणि त्याचा फायदाही चित्रपटाला मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात जवळपास 35 कोटींची कमाई केली आहे.

यानंतर चौथ्या आणि पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत चांगलीच वाढ झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, रिलीजच्या चौथ्या दिवशी चित्रपटाने 16 कोटींची कमाई केली आणि रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाने 17.08 कोटींची कमाई केली.

चित्रपटाने कमाईच्या 5 दिवसांत 70.24 कोटींची कमाई केली आहे. होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाल्याचा फायदा या चित्रपटाला मिळाला आणि त्यामुळेच या चित्रपटाला १०० कोटींचा आकडा पार करणे कठीण जाणार नाही. अशा स्थितीत हा चित्रपट पुढच्या आठवड्यापर्यंत बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

तू झुठी में मक्कार या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले असून चित्रपटाचे संगीत प्रीतम यांनी दिले आहे. हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर हसलीन कौर, बोनी कपूर, डिंपल कपाडिया यांच्यासह अनेक स्टार्स यात दिसले आहेत.