'तू ऑनलाईन ये ना'तून मीरा जोशी करणार घायाळ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 जानेवारी 2019

'तू ऑनलाईन ये ना' हे आयटम साँग नुकतेच प्रदर्शित झाले. प्रेक्षकांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणाऱ्या मीरा जोशी हिच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे.

लव्ह स्टोरी असणाऱ्या 'प्रेमवारी' चित्रपटातील 'तू ऑनलाईन ये ना' हे आयटम साँग नुकतेच प्रदर्शित झाले. प्रेक्षकांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणाऱ्या मीरा जोशी हिच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले असून या गाण्यात तिची एन्ट्री जेसीबी मधून होताना दिसतेय.

या गाण्याचे चित्रीकरण कोपरगावनजीक वारी या गावात झाले. या गाण्याचे बोल गुरु ठाकूर यांचे असून, अमितराज यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तर वैशाली सावंत यांच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार असून प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 

चिन्मय उदगीरकर, मयुरी कापडणे, अभिजित चव्हाण, भारत गणेशपुरे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. 8 फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित होत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tu Online Ye Naa song release