तुंबाड फेम आनंद गांधीच्या 'ओके कॉप्यूटर'चा यूरोपीयन प्रीमियर!

त्यातील वेगळ्या विषयांच्या चित्रपटांना मोठ्या प्रमाणावर प्रसिध्दी मिळताना दिसत आहे.
ok computer
ok computer Team esakal

मुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट (movie) आणि वेब मालिकांचा (web serise) निर्मिती होताना दिसत आहे. त्यातील वेगळ्या विषयांच्या चित्रपटांना मोठ्या प्रमाणावर प्रसिध्दी मिळताना दिसत आहे. त्यांचा राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली क्राईम मालिकेत महत्वाची भूमिका साकारणा-या शेफाली शहा यांच्या (shefali shah) समडे (someday) या चित्रपटाचेही कौतूक झाले आहे. (tumbad fame anand gandhi ok computer serise premier in europian film festival)

आता तुंबाडचे आनंद गांधी (anand gandhi) यांच्या 'ओके कॉप्यूटर' (ok computer) चा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रॉटरडॅम' 2021 मध्ये यूरोपीयन प्रीमियर पार पडला आहे. सोशल मीडियावर आनंद यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. 'ओके कॉप्यूटर'ने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रॉटरडॅम'2021 मध्ये आपला यूरोपीयन प्रीमियर साजरा केला. पूजा शेट्टी आणि नील पेजदारद्वारा रचित आणि निर्देशित, ओके कंप्यूटर ब्राइट फ्यूचर प्रोग्राम अंतर्गत येणारी आणि प्रदर्शित होणारी पहिली वेब सीरिज असून जगभरातील उभरत्या चित्रपट प्रतिभांना समर्पित करण्यात आली आहे.

आनंद गांधी यांच्या मेमेसिस स्टूडियोजद्वारा निर्मित सहा भागांची ही सीरिज भारतीय मंचावर आतापर्यंत पाहण्यात न आलेल्या त्याच्या अभूतपूर्व दृष्टिकोन आणि कक्षेसाठी ओळखली गेली. ही एक दृष्टिपथात असलेल्या यथार्थवादी भविष्याची कल्पना आहे. ज्यात चहावाल्या 'माउशी' बॉट्स, इमर्सिव वीआर वर्ल्ड आणि रोबोट मसीहा आदींचा समावेश आहे. ब्लैक पैंथरने ज्या तऱ्हेने एफ्रोफ्यूचरिज्म मांडला अगदी त्याचप्रमाणे, ओके कंप्यूटर जगाला 'इंडो-फ्यूचरिज्म'ची ओळख करून देतो.

ok computer
Khatron Ke Khiladi 11: स्टंट करताना वरुण सूद जखमी; सेटवर मोठी दुर्घटना

निर्माता आनंद गांधी म्हणाले की, "हा दिग्दर्शक पूजा शेट्टी आणि नील पेजदार यांच्या दृष्टिकोनाचा गौरव आहे." आनंद गांधी त्यांच्या तुंबाड आणि 'शिप ऑफ थीसस'साठी ओळखले जातात. आनंद गांधी पुढे म्हणाले की, "ही मेमेसिसच्या दूरदृष्टिला आश्वासित करणारी गोष्ट आहे कि अभूतपूर्व कथा साकारणाऱ्या नव्या आवाजाला आणि त्यांच्या दूरदर्शीपणाला देखील निरंतर चांगला मंच उपलब्ध होतो आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com