थरकाप उडवणारा 'तुंबाड' तुमच्यासाठी तयार आहे!; टीझर रिलीज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

'शिप ऑफ थिसियस' या सिनेमातून आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता सोहम शाहची 'तुंबाड' मध्ये मुख्य भूमिका आहे. सिनेमाचं दिग्दर्शन राही अनिल बर्वे यांनी केलं आहे. ज्योती माळे, दीपक दामले, अनिता दाते, रंजिनी चक्रवर्ती यांच्याही सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मुंबई : 'तुंबाड' हा रोमांचकारी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आनंद एल राय निर्मित या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. राय यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करत लिहीले आहे की, 'तुंबाड साठी तुम्ही तयार आहात की नाही! तुंबाड तुमच्यासाठी तयार आहे...' 
 

अशा विषयाचा सिनेमा बॉलिवूडमध्ये बऱ्याच दिवसांनंतर प्रेक्षक बघतील. पृथ्वीच्या गर्भातून 16 कोटी देव-देवतांनी जन्म घेतला. पण पृथ्वी देवीला आपल्या सगळ्या संततीपैकी पहिली संतती अधिक प्रिय होती. अनेक युगापासून पृथ्वी देवीचा पहिला मुलगा तिच्या कुशीत झोपला होता. पण एक दिवस त्याला त्याच्या पूर्वजांनी चिरनिद्रेतून जागं केलं. त्याचा श्राप हे त्यांना वरदान ठरणार होतं. ही कथा 1920 या काळातली आहे. अशी कथा टीझर मधून दाखविण्यात आली आहे. 

सिनेमाचा टीझर बघितल्यानंतर सिनेमा भयपट असल्याचे वाटते. 'शिप ऑफ थिसियस' या सिनेमातून आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता सोहम शाहची 'तुंबाड' मध्ये मुख्य भूमिका आहे. सिनेमाचं दिग्दर्शन राही अनिल बर्वे यांनी केलं आहे. ज्योती माळे, दीपक दामले, अनिता दाते, रंजिनी चक्रवर्ती यांच्याही सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमाचे चित्रीकरण महाराष्ट्रातच झाले आहे. 12 ऑक्टोबरला सिनेमा हिन्दी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे. 
     

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Tumbbad Movie Teaser Release