Tunisha Sharma Death: शीझान खानला जामीन नाहीच, 'अली' नावानं आणला तुनिषा शर्माच्या केसमध्ये नवा ट्वीस्टSheezan Khan Bail Rejected | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sheezan Khan Bail Rejected

Tunisha Sharma Death: शीझान खानला जामीन नाहीच, 'अली' नावानं आणला तुनिषा शर्माच्या केसमध्ये नवा ट्वीस्ट

Sheezan Khan Bail Rejected : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शीझान खान न्यायालयीन कोठडीत आहे. शीझानच्या जामीन अर्जावर 9 जानेवारीला सुनावणी झाली, ती 11 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली. दुसरीकडे बुधवारी या प्रकरणी न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली आणि १३ जानेवारीला आज न्यायालय निर्णय देणार होते पण आजही त्याचा जामीन फेटाळला आहे.(Tunisha Sharma: Sheezan Khan Bail Rejected)

२४ डिसेंबर,२०२२ रोजी तुनिषा शर्मा या २० वर्षीय टी.व्ही अभिनेत्रीनं आपली मालिका 'अली बाबा..' च्या सेटवर आत्महत्या केली होती. या प्रकरणात तुनिषाच्या आईनं तुनिषाचा सहकलाकार शीझान खानला दोषी ठरवत आपल्या मुलीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी या संबंधित केस दाखल करुन २५ डिसेंबर रोजी शीझान खानला अटक केली होती.

यापूर्वी 9 जानेवारी रोजी शीझानच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा शीझानच्या वकिलाने दावा केला होता की, आत्महत्येपूर्वी तुनिषा 'अली' नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होती, दोघांची ओळख डेटिंग अॅपद्वारे झाली होती. आत्महत्येच्या 15 मिनिटांपूर्वी तुनिषाने अलीशी व्हिडिओ कॉलवर बोलल्याचा दावाही करण्यात आला होता.

तुनिषाच्या आईने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या दाव्यांवर प्रतिक्रिया दिली आणि तिला डेटिंग अॅपबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. तसेच, तिने अली तुनिषाचा जिम ट्रेनर होता आणि ते फक्त चांगले मित्र असल्याचे सांगितले आहे. आता न्यायालय यावर काय निर्णय देईल हे लवकरच समजेल,तुर्तास तरी शीझानच्या अडचणी या अली नावामुळे वाढल्या आहेत आणि त्याचा जामीन लांबणीवर गेला आहे.