Tunisha Sharma Suicide Case: दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आरोपी शीझान खानला मिळणार जामीन...मात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tunisha sharma and sheezan khan

Tunisha Sharma Suicide Case: दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आरोपी शीझान खानला मिळणार जामीन...मात्र

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात मोठे अपडेट समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपी शीझान खानचा पोलिसांनी तपास पूर्ण केला असून त्याच्याविरुद्ध 524 पानांचे आरोपपत्रही दाखल केले आहे. आता त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असून यावेळी शीजान खानला जामीन मिळू शकतो, असे मानले जात आहे.

शीजान खान गेल्या दोन महिन्यांपासून तुरुंगात आहे. अलीकडेच शीजनने वसई न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून, त्यावर 23 फेब्रुवारी 2023 रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी शीजानला जामीन मिळण्याची शक्यता अधिक आहे. वसई पोलिसांनी शीजनवर 524 पानी आरोपपत्रही दाखल केले आहे.

शीजान खानचे वकील शरद राय म्हणतात की त्यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात अभिनेत्याच्या जामीनासाठी याचिका दाखल केली होती, परंतु आता ती याचिका मागे घेण्यात आली आहे. आता या अभिनेत्याचा जामीन अर्ज वसई न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून पोलिस तपासही पूर्ण झाल्याचे अर्जात म्हटले आहे. त्यामुळे आता आरोपीला जामीन मिळू शकतो.

टीव्ही अभिनेता शीजान खान जवळपास 2 महिन्यांपासून तुरुंगात आहे. त्याच्यावर को-स्टार आणि एक्स गर्लफ्रेंड तुनिषा शर्माला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. अभिनेत्रीने 24 डिसेंबर 2022 रोजी तिच्या 'अली बाबा: दास्तान ए काबुल' या टीव्ही शोच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली.

सीसीटीव्हीनुसार ती आत्महत्येपूर्वी शीजनशी बोलताना दिसली होती. त्याच्या आईनेही शीजनवर फसवणूक केल्याचा आरोप केला. ब्रेकअपनंतर अभिनेत्री डिप्रेशनने त्रस्त असल्याचे बोलले जात होते.