तुनिषा केसमध्ये शीझान खानला अखेर जामीन मंजूर..पण कोर्टानं घातल्या ढीगभर अटी..वाचा Tunisha Sharma Suicide Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sheezan Khan bail

Tunisha Sharma Suicide Case: तुनिषा केसमध्ये शीझान खानला अखेर जामीन मंजूर..पण कोर्टानं घातल्या ढीगभर अटी..वाचा

Sheezan Khan bail: तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात अभिनेता आणि मुख्य आरोपी शीझान खानला अखेर जामीन मिळाला आहे. शीझान खानला १ लाख रुपये भरुन वसई कोर्टानं हा जामीन मंजूर केला आहे. पण जामीन मिळाला असला तरी शीझान खानला आपला पासपोर्ट कोर्टात जमा करावा लागणार आहे.

कोर्टानं २ मार्चच्या सुनावणीनंतर निर्णय स्थगित ठेवला होता. या प्रकरणात वालीव पोलिसांनी गेल्या महिन्यात ५२४ पानांचे आरोप पत्र दाखल केलं होतं. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर शीझान खाननं आपल्या कडून पुन्हा एकदा जामिनासाठी याचिका दाखल केली होती.

शीझान गेल्या अडीच महिन्यांपासून ठाण्यातील जेलमध्ये कैदेत आहे.(Tunisha Sharma Suicide Case Sheezan Khan Bail updates)

कोर्टानं शीझानला जामीन देताना बजावलं आहे की त्यानं केस संदर्भातील पुराव्यांसोबत कोणतीही छेडछाड करू नये..ना केस संदर्भातील कोणत्या साक्षीदाराला संपर्क करायचा आहे. कोर्टानं शीझानला हा देखील आदेश दिला आहे की त्यानं आपला पासपोर्ट पोलिसांकडे जमा करायचा आहे. कोर्टाच्या परवानगीशिवाय शीझान खान परदेशात जाऊ शकणार नाही.

हेही वाचा: तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

तुनिषा शर्मानं वालीव जवळ उभारलेल्या आपल्या मालिकेच्या सेटवर २४ डिसेंबर,२०२२ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अभिनेत्रीच्या आईच्या तक्रारीनंतर शीझान खानला अटक करण्यात आली होती. शीझान खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.