डॉक्टर विनयभंग प्रकरण: टी.व्ही.मालिकेतील कलाकाराला कोल्हापुरात अटक

संशयित जितेंद्रची त्या तरुणीशी एका खासगी विवाह संस्थेच्या वेबसाईटवर ओळख झाली.
Jitendra Pol
Jitendra PolEsakal

कोल्हापूर: खासगी विवाह संस्थेच्या वेबसाईटवर झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी टी.व्ही. सिरीयल मालिकेतील कलाकाराला कोल्हापूर राजारामपुरी (Rajarampuri Police) पोलिसांनी अटक केली. जितेंद्र शेलाजी पोळ (Jitendra Pol)(वय ३२, कात्ययाणी कॉम्प्लेक्स कळंबा) असे त्या संशयिताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Summary

संशयित जितेंद्रची त्या तरुणीशी एका खासगी विवाह संस्थेच्या वेबसाईटवर ओळख झाली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिडीता डॉक्टर आहे. संशयित जितेंद्रची त्या तरुणीशी एका खासगी विवाह संस्थेच्या वेबसाईटवर ओळख झाली. त्याने तिच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला तिने लग्नास नकरा दिल्यानंतर तिच्यावर पाळत ठेऊन त्याने पाठलाग केला. तुझ्याशी थोड बोलायचे आहे असे म्हणून तिचा हात पकडला. पिडीतेने त्याला बाजूला ढकलून स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर त्याने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची फिर्याद पिडीतेने दिली. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Jitendra Pol
जोतिबा खेट्याला 20 पासून सुरुवात; जाणून घ्या, कोल्हापूर अन् खेट्यांची परंपरा

प्राथमिक चौकशीत तो एका प्रसिद्ध टीव्ही मालिकेत भूमिका करत असल्याचे पुढे आल्याचे पोलिस निरीक्षक इश्वर ओमासे यांनी सांगितले. अधिक तपास सहायक फौजदार राजेंद्र कलगुटकर करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com