'जोधा अकबर' फेम अभिनेत्याचा कापावा लागला पाय

'जोधा अकबर'मध्ये साकारली शमसुद्दीन खानची भूमिका
Lokendra Singh
Lokendra Singh

टीव्ही अभिनेते लोकेंद्र सिंह राजावत Lokendra Singh Rajawat यांना तणाव आणि शुगरचं प्रमाण वाढल्याने पाय कापावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लोकेंद्र हे त्यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया आणि आर्थिक परिस्थितीबाबत व्यक्त झाले. लोकेंद्र सिंह राजावत यांनी 'जोधा अकबर' या मालिकेत शमसुद्दीन अटागा खानची भूमिका साकारली होती. 'ये है मोहब्बतें' या मालिकेतही ते झळकले होते.

"माझ्या उजव्या पायाला गाठ आलेली आणि त्याकडे मी दुर्लक्ष केलं. इथूनच सगळी सुरुवात झाली. गाठीचा संसर्ग माझ्या शरीरात पसरला आणि गँगरीनची समस्या उद्भवली. माझा जीव वाचवायचा असेल तर उजवा पाय गुडघ्यापर्यंत कापणे हा एकच पर्याय उरला होता", असं ते म्हणाले.

Lokendra Singh
सलन दोन वर्षे गर्भपात; हरभजनच्या पत्नीने सांगितला 'तो' कटू अनुभव

कोरोना महामाही आणि लॉकडाउनमुळे आरोग्याच्या समस्यांचा खर्च उचलताना नाकीनऊ आल्याचंही त्यांनी सांगितलं. "मी काहीच करू शकत नव्हतो. कोरोना महामारी पसरण्यापूर्वी माझं काम चांगलं सुरू होतं. मात्र लॉकडाउनमध्ये हातून सगळं काम निसटू लागलं. घरात आर्थिक समस्या जाणवू लागल्या. 'सिंटा'कडून मला आर्थिक मदत मिळाली. अनेक कलाकारांनी माझ्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मला फोन केला", असं ते पुढे म्हणाले.

स्वत: आरोग्य जपणं किती महत्त्वाचं असतं हे ५० वर्षीय लोकेंद्र यांनी या मुलाखतीत सांगितलं. कामाचं व्यग्र वेळापत्रक आणि खाण्यापिण्याच्या सवयी यांमुळे डायबिटीसवर नियंत्रण ठेवणं कठीण गेल्याचं त्यांनी सांगितलं. लोकेंद्र यांनी 'जोधा अकबर' आणि 'ये है मोहब्बतें'शिवाय काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलंय. अनुराग बासू दिग्दर्शित 'जग्गा जासूस' आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'मलाल' या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com