esakal | 'रवि बेस्ट किसर, पत्नीनं हे ऐकलं तेव्हा जे झालं'.....

बोलून बातमी शोधा

tv actress nia sharma called ravi dubey the best kisser now his wife sargun mehta reacts }

एशियातील सर्वात सेक्सिएस्ट वुमेन च्या यादीत नियाचा समावेश करण्यात आला आहे. 

'रवि बेस्ट किसर, पत्नीनं हे ऐकलं तेव्हा जे झालं'.....
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  निया शर्मा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती तिच्या वेगवेगळया प्रकारच्या फोटोंमुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. तिनं आता एक विधान केलं आहे त्यामुळे ती भलतीच ट्रोल होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नियानं एका शो मध्ये अभिनेत्याला बेस्ट किसर असे म्हटले होते. नियाच्या विधानावर रवि दुबेच्या पत्नीनंही प्रतिक्रिया दिली आहे.

एशियातील सर्वात सेक्सिएस्ट वुमेन च्या यादीत नियाचा समावेश करण्यात आला आहे. सोशल मीडियावर तिचा फॅन फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात आहे. निया सध्या तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. तिनं जमाई 2.0 चा अभिनेता रवि दुबेच्या बाबत केलेलं एक विधान भलतेच चर्चेत आलं आहे. त्यामुळे नियाला ट्रोलही केले जात आहे.नियानं जे काही विधान केलं त्यामुळे रविची पत्नी सरगुनही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नियाची जमाई 2.0 ही जी मालिका आहे त्यात रवि आणि नियाचे अनेक इंटिमेट सीन्स आहेत. त्यात त्यांचे अनेक किसिंग सीनही आहेत. विशेष म्हणजे त्या मालिकेत एक अंडर वॉटर सीनही दिला आहे. तो प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय़ झाला आहे.

या शो विषयी जेव्हा निया सांगत होती तेव्हा तिनं रवि हा बेस्ट किसर असल्याचे सांगितले आहे. रविची पत्नी ही पंजाबी चित्रपटात काम करते. तिचे नाव सरगुन मेहताने नियाच्या त्या विधानावर प्रतिक्रियाही दिली आहे. नियानं त्या विधानाला पॉझिटिव्हली घेतले आहे. तसेच ती चांगली अभिनेत्री असल्याचेही सांगितले आहे. टाइम्स नाऊशी बोलताना रविनं सांगितले की, जेव्हा मी नियाचे बोलणे ऐकले तेव्हा मी पाहतट राहिलो. मला निया आवडते. नियाला ही गोष्ट माहिती आहे. केवळ मीच नाही तर माझी पत्नी सरगुणलाही निया आवडते. आम्ही दोघांनी जेव्हा तो व्हिडिओ पाहिला तेव्हा आम्ही खुप हसलो. कारण आम्ही नियाला चांगलेच ओळखतो.