बालपण नकोसं झालेलं या टी.व्ही अभिनेत्रीला.. कारमध्ये उपाशीपोटी झोपून काढल्यात रात्री..खुलासा करत म्हणाली..Snehal Rai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Snehal Rai

Snehal Rai: बालपण नकोसं झालेलं या टी.व्ही अभिनेत्रीला.. कारमध्ये उपाशीपोटी झोपून काढल्यात रात्री..खुलासा करत म्हणाली..

Snehal Rai: 'इश्क का रंग सफेद','इच्छाप्यारी नागिन' आणि 'विश' सारख्या मालिकांमधून काम केलेल्या अभिनेत्री स्नेहल राय हिनं मुलाखतीत वैयक्तिक आयुष्याविषयी केलेले खुलासे सध्या भलतेच चर्चेत आले आहेत.

तिनं आपल्या मुलाखतीत लहानपणीच्या नकोश्या वाटणाऱ्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. तिनं सांगितलं की तिच्या बालपणी तिला कौटुंबिक अत्याचाराचा सामना करावा लागला. तिच्या आई-वडीलांमध्ये रोज कडाक्याची भांडणं व्हायची. तिचे वडील तिच्या आईला खूप मारायचे. शिव्या द्यायचे. ज्यामुळे तिला जगणं असह्य झालं होतं. या भांडणांमुळेच आपले आई-वडील विभक्त झाले असं देखील ती म्हणाली .(TV Actress spent her childhood amdist domestic violence used to sleep in the car hungry for many days)

स्नेहलनं हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, ''कौटुंबिक अत्याचाराशी माझा सामना वयाच्या ९व्या वर्षी झाला, तेव्हा मला कळायचं नाही की या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे. अशा कितीतरी रात्री गेल्यात जेव्हा आमच्या आई-वडीलांच्या भांडणांमुळे आम्ही उपाशीपोटी घराबाहेर गाडीत झोपायचो''.

'' आई आम्हाला मात्र या भांडणाच्या भीतीतून बाहेर काढण्यासाठी म्हणायची,'चला आज खेळ खेळूया..गाडीत जाऊन झोपूया. '. अनेकदा घरात जेवण तर बनायचं पण ते आम्हाला खायला दिलं जायचं नाही..कचऱ्याच्या पेटीत फेकलं जायचं''.

'' माझ्या आईच्या चेहऱ्यावर मारलेल्या खुणा असायच्या..ती नेहमी चेहऱ्यावर स्माईल ठेवत त्या जखमांना लपवायचा प्रयत्न करायची. त्यामुळे आम्हाला कधीच कळलं नाही की आई मार खातेय ... शिव्या खातेय..''

हेही वाचा: नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

स्नेहल पुढे म्हणाली,''या सगळ्या गोष्टींनी मला खूप त्रास दिला. माझी रात्रीची झोप उडवून टाकली होती...फक्त चिंताग्रस्त जीवन..त्रासदायक जीवन जगत होते. माझे कोणी मित्र-मैत्रिणी नव्हते कारण घरात कोणाला ते आवडायचं नाही. माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी माझ्या गैरहजेरीविषयी कधी तक्रार केली नाही. कारण त्यांना आमच्या घरातलं वातावरण माहित होतं''.

अभिनेत्री पुढे म्हणाली,'' मी सकाळी सलोनमध्ये रिसेप्शनीस्ट म्हणून काम केलं आणि रात्री कॉलसेंटरमध्ये. मी खूप संघर्षानंतर इथवर आलेय. आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या गोष्टींवर बोलायची हिच योग्य वेळ आहे''.

अभिनेत्री आपल्या वडीलांविषयी बोलताना म्हणाली की,''तिच्या वडीलांनी दुसरं लग्न केलं. त्यांना एक मुलगी आहे. तिच्या आईनं देखील तिचं नवं आयुष्य सुरू केलं आहे''.

स्नेहल पुढे म्हणाली,''मी माझ्या वडीलांना माफ केलं. मला आता कळालंय की ते आता चांगल्या माणसासारखं वागतात लोकांशी. अर्थात त्यांनी आतापर्यंत कधी माझ्या आईशी किंवा आमच्याशी माफी नाही मागितली पण मी त्यांना माफ केलं. कारण मला असं वाटतं की माणूस चुकीचा वागतो पण त्यानं जर सुधारण्याचा प्रयत्न केला तर त्याला ती संधी द्यायला हवी''.