कुंकूम भाग्य मालिकेतील झरिना खान कालवश; इंदू दादीची भूमिका ठरली लोकप्रिय 

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 20 October 2020

कुंकूम भाग्य ही सध्याच्या घडीला टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. त्यात झरीना खान या इंदू दादीची भूमिका करत होत्या. आपल्या अभिनयाने त्यांनी ती त्या भूमिकेला लोकप्रियता मिळवून दिली.

मुंबई - कुंकूम भाग्य या मालिकेतील इंदू दादीची भूमिका करणा-या झरीना रोशन खान यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या 54 वर्षांच्या होत्या. कार्डिअॅक अॅटॅक आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच या मालिकेतील त्यांचे सहकलाकार श्रृती झा आणि शबीर अहूवालिया यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

कुंकूम भाग्य ही सध्याच्या घडीला टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. त्यात झरीना खान या इंदू दादीची भूमिका करत होत्या. आपल्या अभिनयाने त्यांनी ती त्या भूमिकेला लोकप्रियता मिळवून दिली. केवळ हीच मालिका नव्हे तर यापूर्वीही ये रिश्ता क्या कहलाता है, या मालिकेतही त्यांनी काम केले होते. काही चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांनी आपल्या अभिनयामुळे रसिकांच्य़ा मनात घर केले आहे. त्यांच्या जाण्याने प्रेक्षकांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे. या मालिकेतील इतर लोकप्रिय कलाकारांनीही त्यांच्याबद्दल आदरांजली अर्पण केली आहे.  शबीर आणि श्रृती यांनी त्यांच्यासोबतच्या काही आठवणी सोशल मीडियावर शेयर केल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Ye chand sa Roshan Chehera

A post shared by Shabir Ahluwalia (@shabirahluwalia) on

याविषयी सांगताना अनुराग शर्मा म्हणाले, झरीना यांचे जाणे हे धक्कादायक आहे. मनाला चटका लावून जाणारे आहे. त्या अतिशय सुस्वभावी व्यक्तिमत्वाच्या होत्या. त्यांच्यात अखंड उत्साह होता. त्या उत्साहात त्यांच्या वाढत्या वयाचा कुठलाही लवलेश जाणवला नाही. त्यांनी शेवटपर्यंत आपल्या कामाचा ध्यास सोडला नाही हे यावेळी सांगावेसे वाटते. मी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

...

A post shared by Sriti Jha (@itisriti) on

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TV actress Zarina Roshan Khan passes away aged 54