दिव्या भटनागरचा भाऊ स्क्रीनशॉट शेअर करत म्हणाला, ''गगनला तर...''

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 10 December 2020

लग्नानंतर तिच्या खाजगी आयुष्यात अनेक उलथापालथ झाली होती. गेल्या वर्षी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केल्यानंतर आणि पती गगनसोबत संबंध बिघडल्यानंतर ती खूप हैराण होती.

मुंबई- टीव्ही अभिनेत्री दिव्या भटनागरने कमी वयात जगाचा निरोप घेतला. तिचं निधन जरी कोरोनोच्या कारणामुळे झालं असलं तरी लग्नानंतर तिच्या खाजगी आयुष्यात अनेक उलथापालथ झाली होती. गेल्या वर्षी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केल्यानंतर आणि पती गगनसोबत संबंध बिघडल्यानंतर ती खूप हैराण होती. दिव्याचा भाऊ देव भटनागरने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्याने बहीण दिव्याच्या व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. त्याचा हा खुलासा सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे. 

हे ही वाचा: "...तर सुभाष घई अभिनेता झाले असते  

दिव्याच्या निधनानंतर त्याचं खाजगी आयुष्य खुपंच चर्चेत आलं. दिव्याचा पती गगन गबरुवर दिव्याच्या कुटुंबियांसोबतंच अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने देखील मारपीटसह अनेक गंभीर आरोप लावले आहेत. दिव्याच्या भावाने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे ज्यामध्ये त्याची बहीण कोणालातरी पतीकडून मारपीट होत असल्याचं सांगतेय. इतकंच नाही तर या चॅटमध्ये दिव्या सांगतेय की तिला धमकावल्याने तिने त्याच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र या स्क्रीनशॉटची सत्यता पडताळून पाहिलेली नाही. 

Divya Bhatnagar, Divya Bhatnagar brother shared screenshot, Gagan Gabru, Social Media,  Divya Bhatnagar husband Gagan Gabru, दिव्या भटनागर, देव भटनागर

देव भटनागरने चॅट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''काश मला हे सगळं आधी माहित असतं. जर मला हे माहित असतं तर मी तिला सांगितलं असतं की स्वतःसाठी उभी राहा. मी तिला सांगितलं असतं की मुली या संसारात खुप शक्तिशाली असतात. मी तिला या शैतानापासून वाचवण्यासाठी प्रयत्न केला असता. त्याने शेवटी लिहिलंय की, मला वाटतं की गगन गबरुला फाशी व्हावी.''  

Divya Bhatnagar, Divya Bhatnagar family to file case, Gagan, domestic abuse Case, Social Media, Television, Divya Bhatnagar Brother, News 18, दिव्या भटनागर, गगन, दिव्या भटनागर के पति के खिलाफ केस करेगा परिवार

tv divya bhatnagar brother dev bhatnagar shared screenshot says i want gagan to be hanged  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tv divya bhatnagar brother dev bhatnagar shared screenshot says i want gagan to be hanged