Lock Upp: पुनमच्या Bold लूकनं कंगना खूश, तू हॉटनेसची 'शाळा' सुरु कर

अभिनेत्री कंगना रनौतच्या लॉक अप (Lock Upp Show) नावाच्या शो नं आता मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे.
Poonam pandey
Poonam pandeyesakal

Bollywood Actress: अभिनेत्री कंगना रनौतच्या लॉक अप (Lock Upp Show) नावाच्या शो नं आता मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे. त्यामध्ये (Entertainment News) सहभागी झालेल्या वेगवेगळ्या स्पर्धकांनी केलेल्या धक्कादायक खुलाशानंतर त्या रियॅलिटी शो ची लोकप्रियता वाढली आहे. आता पुनम पांडेच्या भलत्याच हॉट लूकवर कंगना रनौत ही जाम खूश झाली आहे. तिनं तिला तर दिलेल्या सल्ल्याची चर्चा आहे. याअगोदर सायशा शिंदे, तेहसीन पुनावाला यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले होते. कंगनानं हा शो सुरु होण्यापूर्वी बॉलीवूडचा भाईजान सलमान खानवर गंभीर टीका केली होती. त्यावर राखी सावंतनं तिला तिचा शो किमान शंभर दिवस चालवून दाखवण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये कंगनाच्या या कार्यक्रमाची चर्चा होती.

ओटीटीवर कंगनाच्या त्या कार्यक्रमाची चर्चा आहे. आता पुनम पांडेचा जो व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे त्यावर कंगनानं कमेंट केली आहे. नव्या एपिसोडमध्ये कंगनानं पुनम पांडेची थोडीशी मस्करीही केली आहे. त्याम्ये ती म्हणते, तुझ्या या नव्या रुपानं आम्हाला खूश केलं. आता तू या बोल्डनेससाठी एखादी शाळा सुरु करायला पाहिजे. कंगना आणि पुनमचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. यापुढील काळात पुनमनं तिचा बोल्डनेस लोकांना शिकवण्यासाठी एखादी शाळा सुरु करावी. अशा प्रकारची कंगनानं दिली आहे.

Poonam pandey
Movie Review: बच्चन पांडे पाहायला जातायं, पण, तो तर...

कंगना त्या व्हिडिओला दाद देताना म्हणते की, तू जो अॅक्ट प्ले केला आहे. त्याला दाद द्यावीशी वाटते. पुनम तू ज्या प्रकारे प्रणयाची भूमिका करते ती आवडते. ती एक कला आहे. वास्तविक ही कला आपल्याकडील इतिहासातील अनेक ग्रंथामधून आपल्यासमोर आलेली आहे. कंगनानं एवढं कौतूक केल्यानंतर पुनमला भलताच आनंद झाला आहे. त्यावेळी कंगना पुन्हा तिला छेडते. आणि म्हणते मला वाटतं पुनमही तिची कला शिकवण्यासाठी एखादी शाळा काढावी. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तू एक अशाप्रकारचं शिक्षण देणारी शाळा काढ. त्यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com