राहुल दिशाकडे 'आशीर्वादासाठी' मागितले सोन्यासह सव्वा लाख

इंडियन आयडॉलमध्ये (indian idol) राहुलनं (rahul vaidya) आपल्या गायकीनं सर्वांना जिंकून घेतलं होतं.
rahul and disha parmar
rahul and disha parmar Team esakal

मुंबई - इंडियन आयडॉलमध्ये (indian idol) राहुलनं (rahul vaidya) आपल्या गायकीनं सर्वांना जिंकून घेतलं होतं. त्यानंतर तो बिग बॉसमध्ये सहभागी झाला. तिथेही त्याला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. त्या शो मध्ये त्याची आणि दिशा परमारची ओळख झाली. आणि त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही दिवसांपूर्वी ते विवाहबंधनात अडकले. कोरोनाच्या काळात देखील त्यांनी धुमधडाक्यात लग्न केलं. सध्या त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. (tv entertainment rahul vaidya disha parmar received blessings from kinnars yst88)

राहुल आणि दिशाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात त्यांना किन्नरांनी येऊन लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहे. मात्र यामुळे ते चर्चेतही आले आहेत. राहुल आणि दिशाची भेट घेतल्यानंतर त्यांनी एकत्र डान्सही केला. यावेळी त्यांनी एक मागणी केली. किन्नरांची ती मागणी ऐकुन त्यांना धक्काच बसला होता. सोशल मीडियावर राहुलनं काही फोटो पोस्ट केले आहेत.

ज्यावेळी किन्नर राहुल आणि दिशा यांना भेटायला गेले होते. तेव्हा ते नाईट सुटमध्ये होते. 16 जुलैला राहुल आणि दिशा विवाहबंधनात अडकले. यापूर्वी राहुल आणि दिशाचे काही फोटो, व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याला त्या दोघांच्याही चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला होता. राहुल दिशाच्या लग्नाचे, प्री वेडिंगचे, हळदीचे असे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो व्हायरल झाले होते.

rahul and disha parmar
‘शेरशाह’चा ट्रेलर पाहून विक्रम बत्रा यांच्या आई-वडिलांची भावूक प्रतिक्रिया

किन्नर जेव्हा राहुलच्या घरी गेले तेव्हा त्यांनी त्या दोघांबरोबरही डान्स केला. यावेळी त्या दोघांनी नाईट सुट घातला होता. किन्नरांनी राहुल आणि दिशाला सांगितलं की, ते बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रेटींकडे जातात. त्यांनी त्या दोघांची नजरही काढली. मात्र आम्ही आमचा मान घेतल्याशिवाय काही जाणार नाही. असे त्यांनी सांगितले. त्यावेळी त्यांनी राहुलकडे सव्वा लाख रुपये आणि सोन्याची निशाणी अशी मागणी केली. हे ऐकुन त्या दोघांनाही धक्का बसला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com