टीव्ही की सिनेमा? 

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

परिणीती चोप्रा ही बॉलीवूडमध्ये एक चांगली अभिनेत्री म्हणून आली; पण काही चित्रपटांनंतर तिने स्वतःला फिट करण्यासाठी इंडस्ट्रीतून चक्क एक-दोन महिन्यांचा नव्हे; तर चांगला दोन वर्षांचा ब्रेक घेतला. पण आता झालंय असं, की तिच्याकडे "मेरी प्यारी बिंदू' हा चित्रपट सोडून इतर कोणतेही प्रोजेक्‍ट हातात नाहीयेत. त्यामुळे सध्या ती इंडस्ट्रीतून बाहेरच आहे. तिने आपलं मस्त फोटोशूटही केलं. पण परिस्थिती जैसे थे... पण याच संधीचा फायदा उठवत टीव्ही इंडस्ट्रीने आपलं लक्ष तिच्याकडे वळवलं. "नच बलिये' या प्रसिद्ध डान्स रिऍलिटी शोचा आठवा सीजन लवकरच येऊ घातला आहे. त्यामध्ये जज म्हणून परिणीतीला विचारण्यात आलंय.

परिणीती चोप्रा ही बॉलीवूडमध्ये एक चांगली अभिनेत्री म्हणून आली; पण काही चित्रपटांनंतर तिने स्वतःला फिट करण्यासाठी इंडस्ट्रीतून चक्क एक-दोन महिन्यांचा नव्हे; तर चांगला दोन वर्षांचा ब्रेक घेतला. पण आता झालंय असं, की तिच्याकडे "मेरी प्यारी बिंदू' हा चित्रपट सोडून इतर कोणतेही प्रोजेक्‍ट हातात नाहीयेत. त्यामुळे सध्या ती इंडस्ट्रीतून बाहेरच आहे. तिने आपलं मस्त फोटोशूटही केलं. पण परिस्थिती जैसे थे... पण याच संधीचा फायदा उठवत टीव्ही इंडस्ट्रीने आपलं लक्ष तिच्याकडे वळवलं. "नच बलिये' या प्रसिद्ध डान्स रिऍलिटी शोचा आठवा सीजन लवकरच येऊ घातला आहे. त्यामध्ये जज म्हणून परिणीतीला विचारण्यात आलंय. पण परिणीतीने अजूनही त्यांना आपला होकार कळवलेला नाही. टीव्ही की सिनेमा? परिणीतीची नुसती द्विधा मनःस्थिती झालीय. 

Web Title: Tv or cinema : parineeti chopra