आता मात्र उर्फीनं कहरच केला! नेटकरी संतापले.. Urfi Javed | urfi javed video | tv urfi javed topless and cover her front body with rose petal video goes viral on social media brutally trolled | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed News

Urfi Javed: आता मात्र उर्फीनं कहरच केला! नेटकरी संतापले...

Urfi Javed Topless Bold Video Viral: टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत असते. ती नेहमीच असं काहीतरी करते की सर्वत्र तिचीच चर्चा होत असते. तिची फॅशन आणि त्या फॅशनसाठी तिनं वापरलेली साधनं यांचीही सोशल मिडियावर चर्चा रंगते.

ती नेहमीच अशा काही गोष्टीचा वापर करुन ड्रेस तयार करते की जे पाहिल्यानंतर नेटकरी डोक्याला हात लावतात. जिथे फॅशनचा विषय असतो तिथे उर्फी जावेद हिच नाव तर येतच. कारण तिनं तिच्या अतरंगी फॅशनमुळे फॅशन जगतात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिम, काच सायकलची चेन, चिमटे इतकच नाही तर किवी च्या फळापासून बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे. आता मात्र उर्फीनं फॅशनची हद्दच पार केली आहे.

उर्फीनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक नवीन फोटो शेअर केला आहे. या फोटोत उर्फी पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर टॉपलेस झाली आहे. उर्फीने टॉप न घालता फोटोशूट केलं आहे. कपड्यांऐवजी उर्फीने तिच्या शरिरावरील काही भागावर गुलाबाच्या पाकळ्या चिकटवल्या आहेत.

त्याचबरोबर तिने राखाडी रंगाची पँट कॅरी केली आहे. उर्फीने यावेळी केसांची उंच पोनीसह स्टाइल केली आहे. अभिनेत्री डोळे मिटून पोज देताना दिसत आहे.उर्फी जावेदचा हा फोटो सोशल मीडियावर वणव्यासारखा व्हायरल होत आहे.

हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनीही डोक्याला हात लावला आहे. त्यानंतर नेटकरी मात्र उर्फीवर चांगलेच भडकले आहेत. त्यांनी तिला ट्रोलच नाही तर तिला कपड्यांच महत्व ही सांगतिलं आहे.

आजकाल उर्फी मोठ्या फॅशन डिझायनर्ससोबत भरपूर फोटोशूट करत आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि पोस्ट शेअर करत असते. ती 'बिग बॉस OTT' आणि 'MTV Splitsvilla' मध्ये दिसली आहे.

टॅग्स :Entertainmentviralphoto