ट्विंकल खन्नाच्या लेकीने क्रिएट केला हॉरर सीन; व्हिडिओ व्हायरल

Twinkle Khanna's Daughter
Twinkle Khanna's Daughter

मुंबई : ट्विंकल  खन्ना मोठ्या पडद्यापासून जरी दूर असली तरी, सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची झलक पहायला मिळते. लेखिका आणि त्याचसोबत निर्मितीकरणाच्या क्षेत्रात आपलं पर्दापण करुन ट्विंकल सोशल मीडियावर अॅक्टिव असते. ट्विंकलला तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायला किंवा शेअर करायला आवडत नसलं तरी लेकीसोबतच्या गमजीजमतींचे व्हिडीओ ती आर्वजून अपलोड करते.

 
असाच एक व्हिडीओ ट्विंकलने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये छोटी नितारा एका हॉरर सिरीजच्या सिनची हुबेहुब नक्कल करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये नितारा तिचे लांब केस सोडून उभी आहे तर, दुसरीकडे पायऱ्यांवरुन तिच्यासारखीच दिसणारी मुलगी समोर येऊन उभी राहते. या व्हिडीओला कॅप्शन देताना ट्विंकलने लिहीलं, "शब्दकोशात दिलेल्या अर्थाप्रमाणे विन-विन सिचुएशन हीच आहे. जेव्हा मुलांना स्लिपओवर करायचं असतं आणि तुम्हाला हॉरर चित्रपटाच्या सिनचं रिक्रिएशन करण्याची संधी मिळते. सोबत तिने Typewriter नावाचा हॅशटॅगही वापरला आहे.

कॅप्शनमध्ये वापरण्यात आलेला हॅशटॅग हा नेटफ्लिक्सच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेब सिरीजचा आहे. 'टाइपरायटर' या हॉरर सिरीजचं दिर्गदर्शन सुजॉय घोष यांनी केलं असून त्यामध्ये  पूरब कोहली, पॉलोमी घोष आणि समीर कोचर यांनी मुख्य भुमिका साकारली आहे. 

ट्विंकल  खन्ना अनेकदा लेक नितारासोबत व्हिडीओ शेअर करते मात्र, नितारा कॅमेरासमोर येण्यास लाजते. ट्विंकल आणि अक्षय कुमार यांचा मोठा मुलगा आरव 17 वर्षांचा आहे तर, नितारा 6 वर्षांची आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com