अक्षय कुमार गे असल्याची होती सासू डिंपलला शंका, लग्नासाठी ठेवली होती 'ही' अजब अट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 May 2020

अक्षय आणि ट्विंकल यांच्या लग्नाला १९ वर्ष झाली आहेत मात्र अक्षय कुमारची सासू डिंपल कपाडियाला एकेकाळी अक्षय कुमार गे वाटायचा. अक्षय आणि ट्विंकलला लग्न करताना अनेक कठिण प्रसंगांना सामोरं जावं लागलं होतं. 

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. सामान्य नागिरकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच घरात बसून लॉकडाऊनचं पालन करत आहेत. यादरम्यान अनेक सेलिब्रिटी त्यांचे लॉकडाऊनमधील फोटो, व्हिडिओ शेअर करत त्या्ंच्या चाहत्यांना अपडेट ठेवण्यासोबतंच त्यांचं मनोरंजन देखील करत आहेत. अशातंच सेलिब्रिटींविषयीचे अनेक जुने किस्से पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहेत. असाच एक किस्सा अभिनेता अक्षय कुमार आणि त्याच्या सासुशी संबंधित आहे.

हे ही वाचा: दीपिका पदूकोणकडे गोड बातमी? हा फोटो शेअर करत म्हणाली..

अक्षय आणि ट्विंकल यांच्या लग्नाला १९ वर्ष झाली आहेत मात्र अक्षय कुमारची सासू डिंपल कपाडियाला एकेकाळी अक्षय कुमार गे वाटायचा. अक्षय आणि ट्विंकलला लग्न करताना अनेक कठिण प्रसंगांना सामोरं जावं लागलं होतं. अक्षय आणि ट्विंकलचा दोन वेळा साखरपुडा झाला आणि मोडला देखील होता.

Twinkle Khanna's mother Dimple Kapadia thought Akshay Kumar was ...

जेव्हा ट्विंकलनला अक्षयने लग्नासाठी प्रपोज केलं होतं तेव्हा तिचा 'मेला' हा सिनेमा रिलीज होणार होता. तिला विश्वास होता की सिनेमा हिट होईल त्यामुळे तिने अक्षयला सांगितलं की सिनेमा फ्लॉप झाला तर मी तुझ्याशी लग्न करेन. अखेर सिनेमा फ्लॉप झाला ट्विंकलने लग्नाना होकार दिला पण तरीही दोघांचं लग्न होऊ शकलं नाही.

WhyTheGap: Twinkle Khanna, Akshay Kumar raise concern over gender ...

ट्विंकलची आई डिंपलने लग्नाला नकार देत एक अट ठेवली होती. त्याचं झालं असं की अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना एकदा करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या टॉक शोमध्ये आले होते. या दरम्यान ट्विंकल खन्नाने हा खुलासा केला होता की तिची आई अक्षयला गे समजायची.

What?! Twinkle Khanna's mother thought Akshay Kumar was gay ...

तिला अक्षयवर यासाठी संशय होता कारण तिच्या एका पत्रकार मैत्रीणीने तिला असं सांगितलं होतं.आणि म्हणून त्यांच्या लग्नाआधी  डिंपल यांनी एक अट ठेवली होती त्यानंतरंच त्यांनी दोघांच्या लग्नासाठी परवानगी दिली.

The Super-Romantic Love Story Of Akshay Kumar And Twinkle Khanna

डिंपल यांनी अक्षय आणि ट्विंकलला लग्नाआधी एकत्र राहण्याची अट घातली होती. दोघांनीही त्यांची ही अट मान्य केली आणि जेव्हा एक वर्ष पूर्ण झालं तेव्हा २००१ साली अक्षय आणि ट्विंकलचं लग्न झालं. 

Akshay-Twinkle relationship: 5 things we didn't know about the ...

लग्नाआधी हे दोघं एकमेकांवर खूप प्रेम करत होते. दोघांनीही एकमेकांसोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांची देखील पसंती मिळत होती. आता यांच्या लग्नाला १९ वर्ष झाली असून दोघांना एक मुलगा आरव आणि मुलगी नितारा आहे.    

twinkle khannas mother dimple kapadia thought akshay kumar was gay  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twinkle khannas mother dimple kapadia thought akshay kumar was gay