कंगनाची रोहित शर्मावर आक्षेपार्ह भाषेत टीका; ट्विटरने केली कारवाई 

स्वाती वेमूल
Thursday, 4 February 2021

राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून सेलिब्रिटींमध्ये ट्विटवॉर सुरू झालंय.

राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून सेलिब्रिटींमध्ये ट्विटवॉर सुरू झालंय. क्रिकेटपटू रोहित शर्मा यानंदेखील या आंदोलनासंदर्भात ट्विट केलं होतं. रोहितच्या या ट्विटला उत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. कंगनाच्या या ट्विटवर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात असतानाच ट्विटरनेही तिच्यावर कारवाई करत तो ट्विट डिलिट केला. 

काय होतं रोहित शर्माचं ट्विट?
जेव्हा कधी आपण एकत्र उभे राहिलो, तेव्हा भारत आणखी ताकदवान, शक्तीशाली झाला. काही तरी पर्याय किंवा उपाय नक्कीच शोधून काढावा लागेल. आपल्या देशात शेतकरी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मला आशा आहे की, आपण सर्वजण एकत्र येऊन यावर काहीतरी उपाय नक्कीच काढू, असं ट्विट रोहितने केलं. 

May be a Twitter screenshot of text that says "Kangana Ranaut @KanganaTeam 59m Why all these cricketers sounding like dhobi ka kutta na ghar ka na ghat ka, why would farmers be against laws which are revolutionary for their well being. These are terrorists who are causing ruckus say that na itna darr lagta hai Rohit Sharma @ImRo45 11h India has always been stronger when we all stand together and finding a solution is the need of the hour. Our farmers play an important role in our nation's well being and am sure everyone will play their roles to find a solution TOGETHER. #IndiaTogether 1K 1.2K 4.2K"

काय होतं कंगनाचं ट्विट?
धोबी का कुत्ता ना घर का घाट का, अशी अवस्था सर्व क्रिकेटपटूंची का झाली आहे? शेतकरी अशा कायद्याविरुद्ध का जातील जो त्यांच्यासाठीच क्रांतीकारी ठरणार आहे. हे गोंधळ घालणारे दहशतवादी आहेत.. असं स्पष्ट बोलायला भीती का वाटतेय?, असा सवाल  कंगनाने रोहितला केला. 

कंगनाचं हे ट्विट सध्या डिलिट केलं असलं तरी रोहितच्या चाहत्यांकडून तिच्यावर टीका करण्यात येत असून तिच्या ट्विटचा स्क्रीनशॉटदेखील व्हायरल करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter deletes Kangana Ranaut tweet against cricketer Rohit Sharma