'अवतार'च्या 'त्या' वक्तव्यावरून गोविंदा ट्रोल!

'अवतार'च्या 'त्या' वक्तव्यावरून गोविंदा ट्रोल!

नवी दिल्ली : अभिनेता गोविंदा रजत शर्मा यांचा शो 'आप की अदालत'मध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी गोविंदाने हॉलीवूड सुपरहिट चित्रपट 'अवतार'चे नाव आपण सुचविल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता त्याला ट्रोल केले जात आहे.

गोविंदाने जेम्स कॅमेरून यांच्या 'अवतार' चित्रपटाचे नाव आपण सुचविल्याचे सांगितले. तसेच अवतारसाठी मला ऑफर आली होती. मात्र, 410 दिवसांत चित्रपटाचे चित्रीकरण करता येत नाही. म्हणून मी त्यास नकार दिला. त्या चित्रपटासाठी जेम्स कॅमेरूनचे नाव मी सुचविले होते.

गोविंदाच्या या वक्तव्यानंतर अभिनेता कमल आर खान यांनीही ट्विट केले. यामध्ये केआरके म्हणाले, की गोविंदाने सांगितले, की मला अवतार चित्रपटाची ऑफर मिळाली होती. मात्र, मी जेम्स कॅमेरून याला चित्रपटाचे नाव सुचवले. मला वाटतं की तो मानसिक आजारी आहे. आता त्याला मदतीची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com