सिद्धार्थ जाधवला जेनेलिया म्हणाली 'रिव्हर्स किंग'

टीम ईसकाळ
सोमवार, 24 जून 2019

अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझामध्ये एक गमतीशीर ट्विटर वॉर सुरू आहे. यामध्ये जेनेलिया वहिनींनी सिद्धार्थला थेट 'रिव्हर्स किंग' म्हणलंय. का म्हणाली असेल जेनेलिया सिद्धार्थला 'रिव्हर्स किंग'? जाणून घ्या....

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझामध्ये एक गमतीशीर ट्विटर वॉर सुरू आहे. यामध्ये जेनेलिया वहिनींनी सिद्धार्थला थेट 'रिव्हर्स किंग' म्हणलंय. का म्हणाली असेल जेनेलिया सिद्धार्थला 'रिव्हर्स किंग'? जाणून घ्या....

अभिनेता रितेश देशमुखने एक फोटो ट्विट केला व या फोटोचे श्रेय जेनेलियाला दिले. त्यानंतर या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव झाला. त्यात एक कमेंट सिद्धार्थनेही केली. 'सर सुपर' अशी सिद्धार्थने कमेंट केल्यानंतर जेनेलिया चक्क मराठीत त्याला रिप्लाय दिला की, 'सर सुपर??? आणि जिने फोटो काढलाय तिच्याबद्दल काही नाही'. 

मग सिद्धार्थने सारवासारवीचा प्रयत्न केला आणि या कमेंटला रिप्लाय दिला की, 'सर सुपर वुमन आहेत जेनेलिया मॅडम, आऊटस्टँडिंग फोटो काढलाय असं लिहायचं होतं. टायपिंग मिस्टेक, सुपर क्लिक.' आणि या कमेंटवर फटकेबाजी करत जेनेलियाने पुन्हा एक रिप्लाय दिला की, 'तुम्ही रिअल लाईफमध्ये पण रिव्हर्स किंग आहात... जमलंय बघा' यावर सिद्धार्थने केवळ 'वहिनीसाहेब' आणि हात जोडत रिप्लाय दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter war between Genelia Disoza and Siddharth Jadhav