अभिनेत्री एलिआना डिक्रुझ भडकली!

टीम ई सकाळ
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मुंबई : सोशल मीडिया हाती आल्यापासून आता थेट कलाकारांशी बोलता येत असल्यामुळे त्याचे चाहते सुखावले आहेत. प्रत्येकवेळी हे कलाकार त्यावर प्रतिक्रीया देतात असं नाही, पण निदान आपलं म्हणणं थेट त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं नवं माध्यम आता खुलं झालं आहे. पण याची नकारात्मक बाजूही समोर येऊ लागली आहे. कलाकारांशी बोलताना तारतम्य न बाळगल्याने अनेक कलाकारांना ही मंडळी दुखावू लागली आहेत. बाॅलिवूड अभिनेत्री एलियाना डिक्रूझलाही अशाच एका चाहत्याने दुखावले आहे. वारंवार ही गोष्ट घडू लागल्याने आता मात्र तिने त्या चाहत्याला सुनावले आहे. 

तिने ट्विट करूनच आपलं मत मांडलं आहे. ती म्हणते, मी एक पब्लिक फिगर आहे याची मला जाण आहे. पण म्हणून कोणीही आपली मर्यादा सोडू नये, कारण मी सेलिब्रेटी असले, तरी शेवटी मी एक स्त्री आहे. एका मर्यादेनंतर या गोष्टी सहन करण्यापलिकडे असतील असंही तिला यातून सूचित करायचे आहे. तिच्या या टि्वटमुळे कालाकारांना होणारा मानसिक त्रास पुन्हा अधोरेखित झाला आहे. या प्रकारात नेमके काय झाले आहे, ते मात्र तिने सांगितलेले नाही. 

काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक केदार शिंदे यांनाही अशाच ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. नेमके काय झाले याचा दाखला न देता त्यांनी कोणीही उठून थेट कमेंट करतं या प्रकारावर नाराजी नोंदवली होती. 

Web Title: twitts Ileana Dcuz Fan slam esakal news