मी आहे कारण आपण आहोत; ट्रेलर आला

टीम ई सकाळ
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित उबुंटू या चित्रपटाचा ट्रेलर आज लाॅंच झाला. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाची चर्चा आहे. उबुंटू या शब्दाचा नेमका अर्थ काय याची चर्चा अनेक ठिकाणी होती, पण या ट्रेलरमध्ये याचा अर्थ उमगतो. उबुंटू या शब्दाचा अर्थ मी आहे कारण आम्ही आहोत. 

मुंबई : पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित उबुंटू या चित्रपटाचा ट्रेलर आज लाॅंच झाला. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाची चर्चा आहे. उबुंटू या शब्दाचा नेमका अर्थ काय याची चर्चा अनेक ठिकाणी होती, पण या ट्रेलरमध्ये याचा अर्थ उमगतो. उबुंटू या शब्दाचा अर्थ मी आहे कारण आम्ही आहोत. 

पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 15 सप्टेंबरला रिलीज होतोय. शाळेत शिकवणारे शिक्षक आणि गावातली उनाड मुलं असा हा सामना रंगणार आहे. शाळेतल्या शिक्षकांचं व्रत ही मुलं कसं पूर्ण करतात याची ही गाेष्ट असावी. या चित्रपटातून पुष्कर श्रोत्री दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. 

Web Title: ubuntoo trailer marathi movie esakal news