Happy Birthday Uday : उदय चोप्राचे 'हे' आहेत सुपरहिट आणि फ्लॉप चित्रपट

टीम ई-सकाळ
Sunday, 5 January 2020

बॉलिवूड अभिनेता उदय चोप्रा याचा आज (ता.5) वाढदिवस आहे.

पुणे : बॉलिवूड अभिनेता उदय चोप्रा याचा आज (ता.5) वाढदिवस आहे. उदय चोप्रा याने अभिनय, निर्माता, पटलेखन आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. उदय चोप्रा हा दिवंगत अभिनेते यश चोप्रा यांचा मुलगा आहे. तर आदित्य चोप्रा यांचा भाऊ आहे. उदय चोप्राने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. त्यातील काही चित्रपट सुपरहिट ठरले तर काही चित्रपट फ्लोप झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उदय चोप्रा याचा जन्म 5 जानेवारी, 1973 रोजी मुंबईत झाला. 1992 ते 2014 या कालावधीत त्याने चित्रपट क्षेत्रात काम केले. 1994 मध्ये 'यह दिल्लगी' या चित्रपटात अक्षय कुमार, काजोल आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका होती. त्या चित्रपटाची निर्मिती चोप्रा यांनी केली.

Image result for uday chopra

उदय चोप्रा याने 2004 मध्ये धूम चित्रपटात भूमिका बजावली. त्यानंतर धूम 2 आणि धूम 3 हा चित्रपटातही त्याने काम केले. त्यानंतर यश चोप्रा यांच्या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून काम केले. राणी मुखर्जी ही उदय चोप्रा याची वहिनी आहे. तर चित्रपट दिग्दर्शक किरण चोप्रा आणि चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा हे बंधू आहेत.

कर्ज फेडलं नाही तर 'ते' घरी येऊन बसतात आणि तुमच्या परिवारासोबत...

'धूम' चित्रपटातील त्याची भूमिका चांगलीच गाजली होती. या चित्रपटात अभिषेक बच्चन याने सहाय्यक पोलिस आयुक्त जय दीक्षितची भूमिका बजावली. तर उदय चोप्रा याने दुचाकी विक्रेता/रेसर अली अकबर फतेह खानची भूमिका साकारली. धूम या चित्रपटाने 2004 पर्यंत 4.5 कोटी रुपयांची कमाई केली. तर संपूर्ण भारतात सुमारे 29 कोटींची कमाई या चित्रपटाने केली.

Image result for uday chopra

'दिल तो पागल है'चे दिग्दर्शन 

उदय चोप्रा याने 1991 मध्ये 'लम्हे', 'परंपरा', 'डर', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'दिल तो पागल है', 'हम तुम' या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.

Image result for dil toh pagal hai

'धूम' सुपरहिट

उदय चोप्राचा धूम चित्रपट चांगलाच सुपर डुपर हिट झाला. या चित्रपटाने सुमारे 31 कोटी 60 लाखांची कमाई केली. धूम-3, धूम-2, मोहब्बते हा चित्रपटही चांगलाच सुपरहिट झाला होता. या चित्रपटाने 41 कोटी 88 लाखांची कमाई केली.  

Image result for dhoom

'नील अन् निक्की' फ्लोप

उदय चोप्रा याने अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. त्यातील नील अन् निक्की, प्यार इम्पॉसिबल, मुझसे दोस्ती करोगे हे चित्रपट फ्लोप झाले. 

Image result for 'नील एन निक्की'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uday chopra and His Movie Info