लग्नाची घाई का? 

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

नर्गिस फाकरी व उदय चोप्रा यांच्याबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा रंगात आल्या होत्या. हे दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत हेच टिपिकल कपलप्रमाणे त्यांनीही सांगितले होते. त्यांना अनेक वेळा पार्ट्या, पिकनिक, डिनर डेट, एअरपोर्टवर एकमेकांबरोबर पाहिले आहे.

ते दोघे एकमेकांशी लग्न करणार अशाही अफवा चालू होत्या. दोघांचे एकत्र फोटो जर कोणी काढत असेल, तर नर्गिस लगेचच आपला चेहरा लपवायची. नुकताच त्यांचा असाच एक फोटो व्हायरल झाला होता. त्यांच्या लग्नाच्या अफवांना कंटाळून नर्गिस फाकरीने ट्‌विटरवरून शेवटी उत्तर दिलेच. ती म्हणाली, "माझे लग्न करून द्यायला एवढे उतावळे का झाला आहात?' यावरून तिने स्पष्ट केले आहे की ते दोघे सध्या तरी लग्न करण्यास इच्छुक नाहीत. तिच्या ट्‌विटवर उदय चोप्रानेही काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. एका मॅगझिनमधील लेखानुसार हे दोघे लवकरच लग्न करण्यास उत्सुक आहेत. नक्की काय हे लवकरच कळेल. सध्या नर्गिस मात्र बालीमध्ये तिची सुट्टी एन्जॉय करत आहे. 

Web Title: Uday Chopra and Nargis Fakhri's secret affair