उदित नारायण, उषा खन्ना यांना महंमद रफी पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

खार रोड : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध गायक महंमद रफी यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त 'स्पंदन आर्ट संस्थे'तर्फे ज्येष्ठ गायक उदित नारायण आणि संगीतकार उषा खन्ना यांना 'महंमद रफी जीवनगौरव पुरस्कार 2016' देऊन गौरवण्यात आले. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शनिवारी (ता.24) हा पुरस्कार सोहळा पार पडला. 

'स्पंदन आर्ट संस्थे'तर्फे महंमद रफी यांच्या जयंतीनिमित्त गायक आणि संगीतकारांना 'जीवनगौरव' पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यंदा पुरस्काराचे 9 वे वर्ष आहे. रफी यांनी गायलेली गाणी कार्यक्रमात सादर करण्यात आली. रफी यांच्या चाहत्यांनी सभागृह भरून गेले होते. या सोहळ्याला पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस केंद्रीय राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान, मुंबई उपमहापौर अलका केरकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आणि रफी यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.

Web Title: Udit Narayan, Usha Khanna awarded with Mohammad Rafi trophy