नेहा कक्कर होणार 'या' प्रसिद्ध गायकाची सून; लग्नाची तारीख ठरली?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

सेटवर चक्क नेहाचं लग्नच ठरविण्यात आलंय आणि तेही एका ज्येष्ठ गायकाने त्यांच्या मुलासाठीच तिला लग्नाची मागणी घातली आहे. कोण आहे हा मुलगा?

बॉलिवूडची लाडकी गायिका नेहा कक्कर नेहमीच तिच्या लव्हअफेअर्समुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तर तीच्याविषयी चर्चांना उधाण येते. सध्या इंडियन आयडॉलच्या सेटवर असे काही किस्से घडतायत की पुन्हा एकदा ती चर्चेत आलीय. या सेटवर चक्क तिचं लग्नच ठरविण्यात आलंय आणि तेही एका ज्येष्ठ गायकाने त्यांच्या मुलासाठीच तिला लग्नाची मागणी घातली आहे. कोण आहे हा मुलगा?

'छपाक'च्या प्रदर्शनापूर्वी दीपिकानं केलं हे महत्त्वाचं काम!

नेहा कक्करला गायक उदित नारायण यांनीच आपल्या मुलासाठी लग्नाची मागणी घातलीय. उदित नारायण यांचा मुलगा आणि इंडियन आयडॉलचा निवेदक आदित्य नारायण याच्यासाठी उदित यांनी नेहाला मागणी घातली आहे. 'हा शो बघण्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे या शोमधील सर्व स्पर्धक टॅलेंटेड आहेत आणि दुसरं कारण म्हणजे गायिका नेहा कक्करला मी सून म्हणून घरी घेऊन जाण्याचा विचार करतोय.' हे ऐकून नेहा शॉक झाली. तिला याची काहीच कल्पना नव्हती. यात आणखी भर म्हणून नेहा कक्करचे आई-वडिलही सेटवर येतात व आम्हाला आदित्य जावई म्हणून पसंत आहे असं सांगतात.

Chhapaak Review : पलके नही है, मगर नजर उठी है!

हे सगळं सुरू असतानाच उदित नारायण यांची पत्नी व आदित्यची आई दीपा याही स्टेजवर येतात व म्हणतात आम्हाला नेहा फार आवडते. आम्ही तिला सून करून घेण्याचा विचार करतोय. या सर्व प्रकारानंतर नेहा-आदित्यच्या लग्नाची तारीखही ठरवली जाते. 14 फेब्रुवारी तारीख ठरवली असून त्याआधी संगीत व मेहंदीचा कार्यक्रमदेखील असे अशी चर्चा स्टेजवर होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोनी टीव्हीने त्यांच्या अकाऊंटवर इंडियन आयडॉलच्या पुढील सिझनचा प्रोमो पोस्ट केलाय. या प्रोमोमध्ये हा सर्व प्रकार घडताना दिसतो. तसेच सेटवर आदित्य नेहमीच नेहासोबत फ्लर्ट करताना दिसतो. त्यामुळे हे खरंच आहे की कार्यक्रमाचाच एक भाग आहे हे शो सुरू झाल्यावरच कळेल.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udit Narayan wants Neha Kakkar to be Aditya Narayan wife