'उडता पंजाब'ची प्रत ऑनलाईन झाली लीक!

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 जून 2016

नवी दिल्ली - सेन्सॉर बोर्डाशी झालेल्या वादामुळे प्रदर्शनापूर्वीच प्रचंड चर्चेत आलेलाउडता पंजाब‘ चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान चित्रपटाच्या टीमने युद्ध पातळीवर प्रयत्न करून लीक झालेला चित्रपट हटविण्यात यश मिळविले आहे.

नवी दिल्ली - सेन्सॉर बोर्डाशी झालेल्या वादामुळे प्रदर्शनापूर्वीच प्रचंड चर्चेत आलेलाउडता पंजाब‘ चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान चित्रपटाच्या टीमने युद्ध पातळीवर प्रयत्न करून लीक झालेला चित्रपट हटविण्यात यश मिळविले आहे.

‘उडता पंजाब‘मधील आक्षेपार्ह असलेली अनेक दृश्‍ये वगळण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाने दिली होती. त्यावर नाराजी व्यक्त करत चित्रपट निर्मात्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने केवळ एक दृश्‍य वगळण्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्णयामुळे येत्या 17 जूनला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच दोन दिवस आधी बुधवारी या चित्रपटाची प्रत बेकायदेशीरपणे टॉरंट वेबसाईटस्‌वर अपलोड करण्यात आली होती. काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मसवर या चित्रपटातील काही दृश्‍यांची चित्रे अपलोड करण्यात आली होती. तसेच अपलोड करण्यात आलेली चित्रपटाची प्रत ही सेन्सॉरला पाठविलेली असल्याच्या प्रतिक्रिया नेटिझन्सनी व्यक्त केल्या होत्या. दरम्यान चित्रपटाच्या टीमने युद्ध पातळीवर प्रयत्न करून लीक झालेला चित्रपट हटविण्यात यश मिळविले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत पंजाबमधील एका स्वयंसेवकी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेमुळे हा चित्रपट पुन्हा एकदा न्यायालयाच्या सुनावणींमध्ये अडकण्याची शक्‍यता आहे.

टॉरंट साईटस्‌ म्हणजे काय?
डिजिटल स्वरुपात मोठ्या प्रमाणात (किंवा आकारात) असलेल्या माहितीचे (विविध स्वरुपातील फाईल्स) इंटरनेटवरून वितरण करण्यासाठीचे माध्यम म्हणजे टॉरंट साईटस्‌. या साईटस्‌वर गाणी, चित्रपट किंवा दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम मोठ्या प्रमाणात अपलोड केले जातात. माहिती वितरणाच्या काही पद्धतींचा (उदा. वेब सर्व्हर, एफटीपी सर्व्हेर) वापर करताना, वितरण करणाऱ्या संगणक आणि नेटवर्कवर मोठ्या प्रमाणावर ताण पडतो. अशा प्रकारचा ताण कमी करण्यासाठी टॉरंट साईटस्‌चा वापर करण्यात येतो.

Web Title: 'Udta Punjab' leaked online