Happy Birthday Rekha : रेखाविषयी तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का?

टीम ईसकाळ
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

सिलसिला, इजाजत, उमराव जान, खुबसूरत अशा चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी रेखा! आज रेखाचा 64वा वाढदिवस...

तिच्याविषयी अनेक माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घ्या...

सिलसिला, इजाजत, उमराव जान, खुबसूरत अशा चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी रेखा! आज रेखाचा 64वा वाढदिवस... भानुरेखा गणेशन असं मूळ नाव असलेल्या रेखाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर 'रेखा' नाव वापरण्यास सुरवात केली. तिचं आयुष्य हे रहस्यमयी व इंटरेस्टिंग आहे. तिच्या जीवनात अनेक चढ-उतार आले, पण सर्वाला ती खंबीरपणे सामोरी गेली...

तिच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

दक्षिणेत जन्मलेल्या अभिनेत्री मूळातच दिसायला सुंदर असतात. रेखाही त्यांच्यापैकीच एक! 10 ऑक्टोबर 1954 मध्ये रेखाचा तमिळनाडूतील मद्रासमध्ये (आताचे चेन्नई) जन्म झाला. रेखाचे वडिल जेमिनी गणेशन हे तमिळ चित्रपटसृष्टीत अभिनेते, तर आई तेलुगू अभिनेत्री होती. त्यामुळे तिला लहानपणापासून घरातूनच अभिनयाचे बाळकडू मिळत गेले. तिच्या वडिलांनी तिचा लहानपणी सांभाळ केला नाही, तिची आईच तिच्यासाठी सर्वस्व होती असं रेखा सांगते. रेखाला एक सख्खी बहिण, एक सावत्र भाऊ व पाच सावत्र बहिणी आहेत.

rekha childhood

बालकलाकार रेखा...
रेखाने आपल्या कारकिर्दीची सुरवात बालकलाकार म्हणून केली. 1966मध्ये 'रंगूला रत्नम' या तेलुगू चित्रपटात काम करून तिने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. मग तिने मागे वळून पाहिलेच नाही व दाक्षिणात्य चित्रपसृष्टीसह हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले. भानुरेखा गणेशन असे पूर्ण नाव असलेल्या रेखाने चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी रेखा हे नाव लावण्यास सुरवात केली. त्या काळी हिरोईनच्या नावांना फार महत्त्व होते. अशातच रेखा हे नाव मनामनात रूजले. 

rekha

हिंदी चित्रपटसृष्टी पाऊल...
बालकलाकार म्हणून झळकल्यानंतर 1969 मध्ये अभिनेत्री म्हणून तिच्या प्रवासाला सुरवात झाली. प्रमुख अभिनेत्री म्हणून तिने कन्नड चित्रपट 'ऑपरेशन जॅकपॉट नल्ली सी. आय. डी. 999' या चित्रपटात काम केले. त्याच वर्षी तिने हिंदी चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवले व 'अंजाना सफर' हा तिचा पहिला चित्रपट ठरला. यात तिला अभिनेता विश्वजीत यांच्यासोबत एक चुंबन दृश्य साकारायचे होते. यावरून बरेच वाद झाले, हा चित्ररपट सेन्सॉरच्या कात्रीत अडकला व तब्बल 10 वर्षांनी 'दो शिकारी' या नावाने प्रदर्शित झाला. 

rekha

रेखा आणि विवाह
रेखाच्या लग्नावरून अनेक उलट-सुलट चर्चा होत गेल्या आणि अजूनही होतात. रेखाशी लग्न झालेल्या पुरूषांचा मृत्यू होतो असे पालुपद त्याकाळी मोठ्या प्रमाणात पसरले होते. त्याला कारण ही तसेच होते. दिल्लीतील उद्योजक मुकेश अगरवाल यांच्याशी रेखाचा 1990मध्ये लग्न झाले. 1991मध्ये त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर 1973मध्ये रेखाने अभिनेता विनोद मेहरा याच्याशी विवाह केल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण काही कारणाने ते एकत्र राहात नसल्याच्या अफवाही समोर आल्या. कालांतराने रेखाला एका मुलाखतीत या बाबत विचारले असता, असे काही नसल्याचे व विनोद माझा फक्त हितचिंतक असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे विनोद-रेखाच्या लग्नाच्या गोष्टीत किती तथ्य आहे हे फक्त तीच सांगू शकते. अभिनेता अमिताभ बच्चन व रेखा यांच्या प्रेमसंबंधाची चर्चाही त्या काळात जोरात होती, पण काही कारणांमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. 

rekha

Related image

 Rekha amitabh

पद्मश्री रेखा 
रेखाला तिच्या अभिनयासाठी सर्वच स्तरांतून वाहवा मिळाली. देशातील सर्वात महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या 'पद्मश्री' या पुरस्काराने रेखाला सन्मानित करण्यात आले. तसेच 'खून भरी माँग'या चित्रपटासाठी रेखाला फिल्मफेअर अॅवॉर्डही मिळाला आहे. तर उमराव जानसाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रेखाला आयफा व झीचा जीवनगौरव पुरस्कारही प्रदान करण्यात आला.   

Image result for rekha padmashri

खासदार रेखा 
रेखाने 2012 ते 2018 या कालावधीत राज्यसभेचे खासदारपदही भूषवले आहे. काँग्रेस पुरस्कृत खासदार रेखाने त्याकाळात अनेक समाजोपयोगी कामे केली. त्यामुळे रेखाचा बालकलाकार, उत्तम अभिनेत्री ते खासदार असा प्रवास सर्वांसाठी आदर्श असा आहे.

rekha


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unknown facts about actress Rekha on her birthday