Oscar 2023: ऑस्कर गाजला खरा.. पण पडद्यामागे लिहिलेलं 'ते' वाक्य कुणीच वाचलं नाही.. जे थेट.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

oscar, oscar 2023, oscar awards news, rrr, natu natu

Oscar 2023: ऑस्कर गाजला खरा.. पण पडद्यामागे लिहिलेलं 'ते' वाक्य कुणीच वाचलं नाही.. जे थेट..

Oscar 2023 News: ऑस्कर 2023 सोहळा दिमाखात पार पडला. यंदाचा ऑस्कर सोहळा सर्व भारतीयांसाठी खास होता. आपल्या भारतीय मातीतला RRR सिनेमा यंदा ऑस्करच्या शर्यतीत होता.

बेस्ट ओरिजिनल सॉंगच्या शर्यतीत RRR ला नामांकन मिळाले होते. RRR ने ऑस्कर पुरस्कारावर स्वतःचं नाव कोरलं. परंतु ऑस्कर संपल्यावर पडद्यामागे एक अशी गोष्ट घडली ती कोणाच्या नजरेत आली नाही.

(unknown facts about oscar 2023 statement written about Number of Oscars telecast without incident)

ऑस्कर 2023 सोहळा दिमाखात पार पडला, पण यंदा या सोहळ्यात कोणतीही वादग्रस्त घटना घडली नाही. गेल्या वर्षी झालेल्या ऑस्कर २०२२ सोहळ्यात विल स्मिथने मस्करी सहन झाल्याने कॉमेडियन क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली होती.

चालू सोहळ्यात घडलेल्या या घटनेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यामुळे ऑस्कर अकॅडमीने विल स्मिथवर १० वर्ष बंद केली.

पण यंदाचा ऑस्कर 2023 सोहळा अत्यंत शांतपणे पार पडला. कोणतीही वेगळी आणि विचित्र घटना घडली नाही ज्यामुळे वाद निर्माण होईल.

त्यामुळे ऑस्कर संपल्यावर पडद्यामागे एक अशी गोष्ट घडली तिच्याकडे कोणाची नजर गेली नाही. पण हि घटना महत्वाची होती.

ऑस्कर 2023 चे होस्ट Jimmy Kimmel यांनी ऑस्कर संपल्यावर सगळ्यांना शुभ रात्री म्हटलं.

पुढे होस्ट Jimmy Kimmel बॅकस्टेजला आला. तिथे एक पाटी होती. त्या पाटीवर लिहिलं होतं.. Number of Oscars telecast Without Incidents. नंतर Jimmy ने त्या पाटीवर १ असा आकडा लावला.

म्हणजेच कोणताही वाद निर्माण न होता हा पहिला ऑस्कर आहे, असा यामागचा अर्थ होता. अशाप्रकारे ऑस्करमध्ये हि खास गोष्ट गेली ज्याकडे कोणाचं इतकं लक्ष गेलं नाही.

आज ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळा पार पडला. जगभरातल्या नामांकित कलाकृती ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नॉमिनेशन लिस्ट मध्ये होत्या. या सर्व कलाकृतींमध्ये भारतीय सिनेमा RRR सुद्धा समाविष्ट होता.

RRR मधील नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरी मध्ये ऑस्कर मिळाला. RRR ने ऑस्कर सोहळ्यात बाजी मारल्याने सर्व भारतीयांची मान उंचावली आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोणने ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर प्रेझेन्टर म्हणून जबाबदारी निभावली