Uorfi Javed : उर्फी जावेदवर दीपिका पदुकोणचा रंग? BOLD आणि HOT लूकने घातला धुमाकूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uorfi Javed shared video on instagram

Uorfi Javed : उर्फी जावेदवर दीपिका पदुकोणचा रंग? BOLD आणि HOT लूकने घातला धुमाकूळ

Uorfi Javed : राज्यात उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या फॅशनवर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. याला उर्फीने देखील सडेतोड उत्तर दिले होते. दरम्यान उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने भगव्या रंगाचे कपडे परिधान करत फोटो शेअर केले आहेत. (Uorfi Javed shared video on instagram)

उर्फी जावेद सोशल मीडियावर तिच्या जगावेगळ्या फॅशनसाठी ओळखली जाते. तिच्या कपड्यांमुळे आणि विचित्र फॅशमुळे अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. उर्फीचे मोठ्या प्रमाणात इंटरनेट फॉलोअर्सस आहेत. उर्फी जावेदने तिच्या Instagram अकाऊंटवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे आणि तिने शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या पठाणला पाठिंबा दर्शविला आहे. कारण तिने व्हिडिओमध्ये भगव्या रंगाचा कट-आउट बोल्ड ड्रेस घातला आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहेत. 

उर्फी जावेद अनेकदा वेगवेगळ्या वस्तू पासून कपडे तयार करते. कोणी विचारही करत नसेल अशा तिच्या फॅशन असतात. उर्फी जावेद तिच्या बोल्ड आणि हॉट लूकने तिच्या चाहत्यांची मने जिंकते. चाहत्यांसाठी ती रोज नवीन फॅशनसह फोटो शेअर करते. पठाणमधील बेशरम रंग या गाण्यात भगवा रंगाची बिकिनी घातल्याबद्दल दीपिका पदुकोणवर मोठी टीका झाली होती. 

उर्फी जावेदने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये उर्फीने बोल्ड कट-आउट ड्रेस परिधान केला आहे. तसेच बेशरम रंग हे बॅकग्राऊंडला म्युझिक वाजत आहे. उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताच चाहत्यांनी टीका देखील केली आहे. उर्फी ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. उर्फीने मुद्दाम भगव्या रंगाचे कपडे परिधान केल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

उर्फीने वाद निर्माण करण्यासाठी हे केल्याचे लोक म्हणत आहेत. विशेष म्हणजे पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात दीपिका पदुकोण भगव्या बिकिनीमध्ये दिसली होती, त्यामुळे बराच वाद झाला होता. सेन्सॉर बोर्डानेही या गाण्यावर आणि चित्रपटावर अनेक प्रकारे कात्री लावली आहे.