'ट्वेंटी20'वर करणार हे चित्रपट राज!

संतोष भिंगार्डे
Saturday, 4 January 2020

एकाच दिवशी दोन बडे चित्रपट प्रदर्शित होण्याची परंपरा हिंदी चित्रपटसृष्टीसाठी तशी काही नवीन राहिलेली नाही. मागील वर्षी "मिशन मंगल' व "बाटला हाऊस' हे चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या दोन्ही चित्रपटांना चांगले यश मिळाले. या वर्षीही असेच ऐतिहासिक, बायोपिक, देशभक्तीपर चित्रपटांबरोबरच काही चित्रपटांचे सिक्वेलही येणार आहेत. प्रेक्षकांना खुसखुशीत आणि चमचमीत मनोरंजनाची धमाकेदार मिसळ मिळणार आहे.

सुरू झालेल्या नवीन वर्षाची सुरुवातच दोन बिग बॅनर्स आणि बिग स्टार्स यांच्या चित्रपटांनी होणार आहे. यातील एक ऐतिहासिक, तर दुसरा सत्य घटनेवरचा चित्रपट. अर्थात एक "तान्हाजी... द अनसंग वॉरियर्स' आणि दुसरा आहे "छपाक'. या दोन्ही चित्रपटांचे विषय वेगळे आहेत आणि दोन्ही चित्रपट मोठ्या स्केलवर प्रदर्शित होणार आहेत. यातील विशेष म्हणजे तानाजी... हा चित्रपट 2 डी आणि 3 डीमध्ये असणार आहे. त्याच्या स्पेशल इफेक्‍ट्‌सवर मोठा खर्च झाला. हा चित्रपट थ्रीडीमध्ये पाहण्याची मजा काही औरच असणार आहे.

'भूज'चा फर्स्ट लुक आउट; अजय देवगण उडविणार पाकिस्तानची दाणादाण

Image result for tanhaji poster

"छपाक' हा मेघना गुलजारचा चित्रपट आहे. दिल्लीमध्ये लक्ष्मी अग्रवाल या तरुणीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. दीपिका पदुकोन मुख्य भूमिकेत आहे. रणवीर सिंगबरोबर नाते जोडल्यावर, दोनाचे चार केल्यानंतर तिचा प्रदर्शित होणारा पहिलाच चित्रपट आहे. मागील वर्षी "मिशन मंगल' व "बाटला हाऊस' हे चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या दोन्ही चित्रपटांना चांगले यश मिळाले. या वर्षीही असेच चित्र बॉलीवूडमध्ये दिसणार आहे. ऐतिहासिक, बायोपिक, देशभक्तीपर चित्रपटांबरोबरच काही चित्रपटांचे सिक्वेलही येणार आहे. प्रेक्षकांना खुसखुशीत आणि चमचमीत मनोरंजनाची धमाकेदार मिसळ मिळणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image result for chhapaak

'छपाक' गर्ल लक्ष्मी अग्रवाल आहे तरी कोण ?

"स्ट्रीट डान्सर' श्रद्धासोबत कंगनाचा "पंगा'
ओम राऊतचा "तान्हाजी...द अनसंग वॉरियर्स' आणि "छपाक' या चित्रपटांबरोबरच वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला "स्ट्रीट डान्सर' हा चित्रपट कंगना रानौतशी "पंगा' घेणार आहे. रेमो डिसूझा "स्ट्रीट डान्सर'चे दिग्दर्शक आहेत. एबीसीडीचा हा तिसरा भाग आहे आणि नावाप्रमाणेच हा चित्रपट डान्सवर आहे. "पंगा' हा चित्रपट अश्‍विनी अय्यर यांनी दिग्दर्शित केलेला आहे. कबड्डीवर आधारित हा चित्रपट आहे. हे दोन्ही चित्रपट 24 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहेत.

Related image

Image result for panga

इम्तियाज अली आणि व्हॅलेंटाईन डे हा एक सुपरहिट कॉम्बो 2020 मध्ये प्रेक्षकांना "लव आज कल 2'च्या रूपाने पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सारा अली खान आणि कार्तिक आर्यन हे पेअर आहे आणि ते पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत. दोघेही डेटिंग करीत असल्याच्या चर्चा खूप रंगलेल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटात त्यांची चांगली ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्याच दिवशी अर्थात 14 फेब्रुवारी रोजी आयुषमान खुरानाचा "शुभमंगल ज्यादा सावधान' हा चित्रपटही येत आहे. त्याच्याच सुपरहिट चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.

#StreetDancer : वरुण-श्रद्धाच्या 'स्ट्रीट डान्सर'चा ट्रेलर एकदा पाहाच!

Image result for love aaj kal 2
लव आज कल 2

"दबंग'नंतर सलमान खान आणि प्रभुदेवा पुन्हा "राधे' नावाच्या आणखी एका चित्रपटासाठी एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात दिशा पटानी ही मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 22 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तो ट्रान्सझेंडरची भूमिका साकारीत आहे. या सिनेमात तो त्याची "गूड न्यूज' या चित्रपटातील सह-अभिनेत्री कियारा अडवाणी हिच्यासोबत पुन्हा एकत्र दिसेल. 2011 मध्ये आलेल्या तमीळ चित्रपट "कांचना'चा अधिकृत रिमेक आहे. राघवा लॉरेन्स यांनी तमीळमधील चित्रपटाचे व त्याच्या सिक्वेलचे दिग्दर्शन केले होते आणि आता बॉलीवूडमधील रिमेकचे दिग्दर्शनदेखील तेच करणार आहेत. "राधे' या चित्रपटाला बॉक्‍स ऑफिसवर कशी काय टक्कर देतो हे पाहणे औत्सुक्‍याचे असणार आहे. "सूर्यवंशी' आणि "इंशा अल्लाह' हे दोन चित्रपटही एकमेकांशी जोरदार स्पर्धा करणार आहेत.

येतोय 'सूर्यवंशी'! रोहित शेट्टीबरोबर आता अक्षयकुमार घालणार धुमाकूळ

Image result for suryavanshi

रोहित शेट्टीने "सिंघम' या चित्रपटाचा पुढील भाग "सिम्बा' आणला. रणवीर सिंगने या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली. यामध्ये अजय देवगणही होता. त्याच वेळी या चित्रपटाचा पुढील भाग "सूर्यवंशी' येणार असे जाहीर करण्यात आले होते. अक्षय कुमार यामध्ये मुख्य भूमिका साकारणार हे निश्‍चित झाले होते. "सिम्बा'मध्ये शेवटी तशा प्रकारची एक झलकही दाखविण्यात आली आणि आता हा चित्रपट "इंशा अल्लाह' या चित्रपटाला टक्कर देणार आहे. सूर्यवंशीमध्ये अक्षय कुमार एटीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे आणि त्याची नायिका आहे कतरिना कैफ. यापूर्वी त्यांनी "नमस्ते लंडन'मध्ये काम केले होते. "इंशा अल्लाह'मध्ये सलमान खान आणि आलिया भट मुख्य भूमिकेत आहेत. असे काही चित्रपट आणि स्टार्स एकमेकांसमोर उभे राहणार आहेत.

'शकुंतला देवी'मधील विद्या बालनचा लूक पाहिला का?

बायोपिक आणि देशभक्तीपर चित्रपट
नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफजईच्या जीवनावर आधारित चित्रपट "गुल मकई' नावाचा चित्रपट येत आहे. अमजद खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रिम शेख ही अभिनेत्री मलाला यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. ओम पुरींनी या चित्रपटात काम केले आहे आणि त्यांचा हा शेवटचा चित्रपट असेल. त्याचबरोबर गणितज्ज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित "शकुंतला देवी' हा चित्रपट येत आहे. या चित्रपटात विद्या बालनने शकुंतला देवीची व्यक्तिरेखा साकारली आहे.

Image result for shakuntala devi movie

तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर येणाऱ्या चित्रपटात कंगना रानौत मुख्य भूमिकेत आहे. कारगिल युद्धात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या महिला वैमानिक लेफ्टनंट गुंजन सक्‍सेना यांच्या जीवनावर आधारित "गुंजन सक्‍सेनाः द कारगिल गर्ल' हा चित्रपट येत आहे. यामध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर गुंजन सक्‍सेना यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. "सरदार उधम सिंह' हा भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारी उधम सिंह यांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. असे काही बायोपिक या वर्षी पडद्यावर येणार आहेत. तसेच "सत्यमेव जयते-2', "अटॅक' असे काही देशभक्तीपर चित्रपट येणार आहेत.

विकी कौशल आता 'या' स्वातंत्र्यसैनिकाच्या भूमिकेत

Image result for udham singh vicky kaushal
सरदार उधम सिंह

दिवाळी, ख्रिसमस आणि ईद
हिंदी चित्रपटसृष्टीत आमीर खान, सलमान खान आणि शाहरूख खान यांचे बहुतेक चित्रपट दिवाळी, ख्रिसमस आणि ईदला प्रदर्शित होत असतात. या वर्षीच्या दिवाळीत अक्षय कुमारचा बहुचर्चित "पृथ्वीराज' हा चित्रपट येत आहे. सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. विश्‍वसुंदरी मानुषी छिल्लर या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. या चित्रपटाबरोबरच कंगनाचा "धाकड' हा चित्रपटही येत आहे. ख्रिसमसला आमीर खानचा "लाल सिंह चढ्ढा' हा चित्रपट येणार आहे. चंडीगडमध्ये नोव्हेंबर महिन्यात चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलची सुरुवात झाली आणि आमिरच्या सरदारजीच्या लूकने चाहत्यांना वेड लावले आहे. "थ्री इडियट्‌स'नंतर आमीर पुन्हा एकदा करीना कपूर खानसोबत या चित्रपटात दिसणार आहे. "सिक्रेट सुपरस्टार'फेम अद्वैत चंदन या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. सलमान खानचा "राधे' चित्रपट ईदला येणार आहे.

Related image

अन्य काही महत्त्वाचे चित्रपट
भारतीय क्रिकेट संघाने 1983 मध्ये विश्‍व करंडक स्पर्धा जिंकली होती. कपिल देवच्या नेतृत्वाखाली चषक भारतात आणला होता आणि त्याच कपिल देव यांच्यावर "83' हा चित्रपट येणार आहे. रणवीर सिंग यामध्ये कपिलदेव यांची भूमिका साकारत आहे. रणवीर सिंगसोबत दीपिका पादुकोण, बोमन इराणी, ताहिर राज भसीन, साकीब सलीम, ऍमी विर्क जिवा, साहिल खट्टर, चिराग पाटील आणि आदिनाथ कोठारे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. संजय लीला भन्साळी "गंगूबाई काठियावाडी' या सिनेमा घेऊन येत आहेत. आलिया भट यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय "शमशेरा', "भूलभुलैय्या 2', "भूजः द प्राईड ऑफ इंडिया', "जर्सी', "तुफान', "कुली नं.1' सारखे चित्रपट ही 2020मध्ये प्रदर्शित होणार आहेत. थोडक्‍यात या वर्षातील मनोरंजनाचा खजिना प्रेक्षकांसाठी मेजवानीच ठरणार आहे...

Image result for 83 movie poster

साडेपाचशे कोटी आणि अक्षय कुमार
अभिनेता अक्षय कुमारचे चार चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहेत आणि या चारही चित्रपटांचे बजेट आहे साडेपाचशे कोटी रुपये. सूर्यवंशीचे बजेट 80 कोटी रुपये आहे, तर ऐतिहासिक पृथ्वीराज चित्रपटाचे बजेट जवळपास 300 कोटी रुपये आहे. "लक्ष्मीबॉम्ब' या चित्रपटाचे बजेट अंदाजे 100 कोटी रुपये आहे. तसेच बच्चन पांडेचे 70 ते 80 कोटी.

Image result for akshay kumar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: upcoming blockbuster films in 2020