फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोअॅक्टिव्ह व स्वरुप रिक्रिएशन्स अॅण्ड मिडीया प्रा. लि. प्रस्तुत 'होम स्वीट होम' या मराठी सिनेमाचा ह्रद्यस्पर्शी टीझर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि रिमा लागू यांची अफलातून केमिस्ट्री बघायला मिळेल.
'होम स्वीट होम' या सिनेमाच्या टीझरमध्ये रिमा आणि मोहन जोशी यांच्या नात्याचा गोडवा विषद केला आहे. सोबतीला प्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांची 'नात्याचे रुटीन चेकअप' सांगणारी त्यांच्याच आवाजातील कविता आहे. नात्यात संवादाचे प्रेशर जपणे असेल, खाण्यापिण्यासंबंधीचे पथ्य असेल किेंवा दाम्पत्यातील खट्याळपणा असेल, अशा सर्वच बाबी टीझरमध्ये कवितेच्या रुपाने सादर केल्या आहेत. 35 वर्ष एकाच घरात वास्तव्य केलेल्या दाम्पत्याच्या मनात घराविषयी असणारे स्थान टीझरमध्ये उल्लेखला आहे. टीझरच्या शेवटी प्रसाद ओक, विभावरी देशपांडे आणि ह्रषिकेश जोशी दारातून डोकावताना दिसतात.
अभिनेता, लेखक ह्रषिकेश जोशी 'होम स्वीट होम' मधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. ‘होम स्वीट होम’ ची कथा हृषीकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे, संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर हे चित्रपटाचे निर्माते तर नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते असून आकाश पेंढारकर, विनोद सातव, सचिन नारकर आणि विकास पवार हे प्रस्तुतकर्ते आहेत. आयुष्यात आपल्या घराचं स्थान काय असतं हे विषद करताना जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारा अत्यंत हटके असा ‘होम स्वीट होम’ येत्या 28 सप्टेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.