
Urfi Javed New Look: 'तुला पाहून चेटकिणीलाही अटॅक यायचा',उर्फीचा नवा लुक व्हायरल..नेटकरीही घाबरले
Urfi Javed Viral Video: उर्फी जावेद हे असं नावं आहे की ज्याला परिचयाची गरज नाही. म्हणजे असं काही मोठं नावही नाही मात्र तिच्या अतरंगी फॅशनमुळं ती चर्चेत असते. सोशल मिडियावर पाहिलं तर तिच्या फॅशनचा व्हिडिओ तुम्हाला सहज दिसतो. तिच्या चाहत्यांची सख्यांही बरिच आहे. तिला 4 मिलिअनपेक्षा जास्त लोक फॉलो करतात. आपण कल्पनाही नाही करु शकत अशा वस्तूंचे ड्रेस तयार करुन ती परिधान करत असते.
मात्र आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असलेल्या उर्फी जावेदच्या नव्या लूकने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या व्हिडिओत ती भुवयाशिवाय खरंच खूप विचित्र दिसतेय. गुलाबी रंगाचे मोकळे केस.. काळ्या रंगाचा ड्रेस आणि विचित्र मेकअप तोही भुवयानशिवाय असा काहीसा तिचा यावेळचा लुक आहे.
उर्फीने पुन्हा एकदा लोकांना तिच्याबद्दल बोलण्यास भाग पाडले आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडिओवर लोक जोरदार कमेंट करत आहेत. खरं तर तिनं एका ब्रण्डसाठी हे फोटोशुट केलं आहे.
एका नेटकऱ्यांनं लिहिले , ' डायन', तर एकानं लिहिले - हे तिचं खरं रूप आहे. एकानं कमेंट करत लिहिलयं, मी एक मिनिटासाठी घाबरलोचं. उर्फीपेक्षा अॅनाबेलही चांगली आहे, असं म्हणत लोक उर्फीला ट्रोल करत आहेत.
उर्फी जावेद कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते आणि त्यामूळे ट्रोलच्या निशाण्यावर येते. आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमपर्यंत बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे. आता हे नेटकऱ्यांसाठी काहीतरी वेगळं आहे.