'बुरा ना मानो..' Urfiवर चढला होळीचा रंग! स्कर्ट कुठे घालावा हेही सुचेना. Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed News

'बुरा ना मानो..' Urfiवर चढला होळीचा रंग! स्कर्ट कुठे घालावा हेही सुचेना. Video Viral

आज सर्वत्र होळीचं जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे. सर्व सामान्याबरोबरच कलाकारही होळी निमीत्त रंगात रंगलेले आहेत. सोशल मिडियावरही होळीचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. अनेक कलाकारांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत .

आता यातच उर्फीनंही तिचा व्हिडिओ शेअर करत होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र नेहमीप्रमाणे तिने तिच्या हटके स्टाईलमध्ये या शुभेच्छा दिल्या आहेत. आता तिची हटके स्टाईल म्हणजे तिचा अतरंगी ड्रेस..मात्र यावेळी तिनं तिच्या ड्रेसबरोबरच तिच्या हेअर स्टाईलचाही अविष्कार केला आहे.

आपल्या हातांनी गुलाल उधळताना उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला असून चाहत्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, उर्फीच्या होळीपेक्षाही चाहत्यांच्या नजरा तिच्या रंगीबेरंगी ड्रेसवर खिळल्या आहेत. उर्फीने तिचा स्कर्ट अशा ठिकाणी घातला आहे की तुम्ही हसाल.

पांढऱ्या रंगाचा ब्रॅलेट आणि हातात हातमोजे घातलेली उर्फी व्हिडिओमध्ये गुलाल उधळताना दिसत आहे. उर्फी 'शाम गुलाबी शहर गुलाबी' या गाण्यावर रंगसंगती करताना दिसत आहे.

मात्र, यावेळी चाहत्यांच्या नजरा उर्फीच्या फाटलेल्या स्कर्टवर खिळल्या. जी तिने कंबरेवर नव्हे तर गुडघ्यांवर घातला आहे. सर्वात फनी म्हणजे तिची वाऱ्यावर उडणाकरी आणि उभी असलेली वेणी..

उर्फी जावेदचा हा ड्रेस पाहून चाहते वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. हिंदूंच्या सण होळीची खिल्ली उडवल्याबद्दल काही लोक उर्फीला ट्रोल करत आहेत. त्याचवेळी काही चाहते उर्फीच्या ड्रेसवर कमेंट करत आहेत.

टॅग्स :viralVideoactress