Urfi Javed: उर्फीताई सुधारणार नाहीच.. उर्फीचं माफी मागण्याचं खरं कारण ऐकून तुम्ही डोक्यावर हात माराल

Urfi Javed
Urfi JavedEsakal

उर्फी जावेद हिने काल तिच्या कपड्यामुळे ट्विट केलं आणि चर्चांना उधाण आलं. तिनं एक ट्विट केले आणि तिच्या कपड्यांमुळे लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली. उर्फीचे ट्विट काही वेळातच व्हायरल झाले.

Urfi Javed
कंगना तोंडावर पडली..! प्रियांका चोप्रा - करण जोहरची एकमेकांना गळाभेट, व्हिडिओ व्हायरल

उर्फीने माफी मागितली होती. तिने लिहिले, 'मी जे परिधान करते त्यामुळे सर्वांच्या भावना दुखावल्याबद्दल मी माफी मागते. आतापासून तुम्हा लोकांना बदललेली उर्फी दिसेल. क्षमा.'

या निर्णयावर काही लोकांनी अभिनेत्रीचे कौतुक करण्यास सुरुवात केली. नेटकऱ्यांना तिचं कौतुक करायला सुरवात केली. तर काहींना तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता.

कारण लोकांना तिचा स्वभाव चांगलाच माहित आहे. त्यामुळे तिनं असे ट्विट का केलं याची उत्सूकता नेटकऱ्यांना लागली होती. आता तिनेच दुसरं ट्विट करत त्यामागचं कारण सांगितलं आहे.

Urfi Javed
Raghav Chaddha : शिंदे गटाचे मंत्रीही अभिनेत्रीच्या प्रेमात; 'या' आहेत राजकारण अन् सिनेसृष्टीतल्या जोड्या

आता तिनं आणखी एक ट्विट केले आहे, जे व्हायरल होत आहे. उर्फी जावेदने सर्वांना एप्रिल फूल बनवलं आहे. तिनं ट्विट केलयं की, 'एप्रिल फूल. मला माहित आहे की मी खूप बालिश आहे.

आता तिच्या या ट्विटलाही नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. उर्फी कधी सुधरुचं शकत नाही हे त्याच ठाम मत आहे आणि ते खरं आहे अशा प्रतिक्रिया नेटकरी तिच्या ट्विटला करत आहेत.

Urfi Javed
NMACC लाँचमध्ये प्रियांका चोप्रापासून ऐश्वर्या अन् सलमानपर्यंत सर्वच कलाकारांची भरली जत्रा!

तिच्या या पोस्टला तिने एप्रिल फूल प्रँक म्हटलं आहे. त्यामुळे उर्फी काही सुधरणार नसुन ती तिच्या फॅशनचा अविष्कार सुरुच ठेवणार असल्याचं तिच्या ट्विट मधुन दिसतयं.

उर्फी ही तिच्या चित्र विचित्र फॅशनसाठी ओळखली जाते. आपल्या कल्पना शक्तीच्या पलिकडे तिची फॅशन असते.

आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिम, काच सायकलची चेन, चिमटे इतकच नाही तर किवी च्या फळापासून बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com