सर्जिकल स्ट्राईकवरील 'उरी'चा ट्रेलर प्रदर्शित

वृत्तसंस्था
बुधवार, 5 डिसेंबर 2018

विकी कौशल या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून, यामी गौतम आणि परेश रावल यांचीही भूमिका आहे. विकी कौशल कमांडोच्या भूमिकेत आहे. उरी येथील लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 19 जवान हुतात्मा झाले होते.

मुंबई : भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची दखल बॉलिवूडने घेत या घटनेवरील आधारित 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
विकी कौशल या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून, यामी गौतम आणि परेश रावल यांचीही भूमिका आहे. विकी कौशल कमांडोच्या भूमिकेत आहे. उरी येथील लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 19 जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. भारताच्या या सर्जिकल स्ट्राईकची जगभरात चर्चा झाली होती.

आता याच घटनेवर पडद्यावर आणण्यात आले आहे. आदित्य धार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात बॉलिवूडमधील एकही प्रसिद्ध चेहरा नसला तरी अॅक्शन भरपूर आहे. हा चित्रपट 11 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uri trailer Vicky Kaushal starrer Uri film based on surgical strike