काय सांगता! कुत्र्यांसाठी आईस्क्रीम बनवली, उर्मिला कोठारेचा बिझनेस थेट Shark Tank India 2 मध्ये? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

urmila kothare, urmila kothare business, shark tank india 2

काय सांगता! कुत्र्यांसाठी आईस्क्रीम बनवली, उर्मिला कोठारेचा बिझनेस थेट Shark Tank India 2 मध्ये?

Shark Tank India season 2: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध रियॅलिटी शो शार्क टँकचा सध्या दुसरा सीझन शानदार पद्धतीने सुरु आहे. अनेक नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन बिझनेसमन शार्क टॅंकमध्ये येत आहेत.

शार्क टॅंकच्या पहिल्या सिझनपासूनच या शो जेव्हा सुरु झाला तेव्हापासून त्याची लोकप्रियता ही कायम राहिली आहे. शार्क टॅंक २ सुद्धा TRP मध्ये अव्वल राहिलाय. याच शार्क टॅंकमध्ये मराठमोळी अभिनेत्री ऊर्मिला कोठारे (Urmila Kothare)चा व्यवसाय सहभागी झालाय.

(urmila kothare business in shark tank india 2)

Shark Tank India season 2 चा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या प्रोमोत दर्शनकौर खालसा ही बिझनेसवूमन Waggy Zone या कुत्र्यांसाठी असलेल्या आईस्क्रीमचा बिझनेस सर्वांसमोर मांडते.

शार्क टॅंक मधील पाचही जजेसच्या चेहऱ्यावरून त्यांना हा बिझनेस आवडलेला दिसतोय. या बिझनेसचं आणि उर्मिलाचं खास नातं असलेलं समजतंय.

उर्मिलाने स्वतःच्या इंस्टाग्रामवरून शार्क टॅंक इंडिया २ चा हा नवीन प्रोमो शेयर केलाय. या प्रोमो मध्ये असलेल्या बिझनेस वूमनचं उर्मिलाने कौतुक केलंय.

Waggy Zone या बिझनेसचं आणि उर्मिलाचं एक खास कनेक्शन आहे. उर्मिलाच्या मैत्रिणीचा हा बिझनेस असून उर्मिला सुद्धा या बिझनेसमध्ये सहभागी असल्याचं समजतंय.

Waggy Zone या बिझनेसचं उर्मिला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रमोशन करत असते. उर्मिलाला स्वतःलाही पेट्सची आवड असून ती तिच्या मैत्रिणीच्या या व्यवसायात रस दाखवून तिच्या बिझनेसला कायम पाठिंबा देत असते.

मराठी मनोरंजन विश्वातील एक देखणी आणि कसदार अभिनय करणारी अभिनेत्री म्हणजे उर्मिला कोठारे. गेली अनेक वर्षे ती मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. अभिनेत्री म्हणून ती चर्चेत आहेच पण ती कोठारे घराची म्हणजे महेश कोठारे यांची सून आहे.

गेली काही दिवस तिच्या कामपेक्षा तुझ्या वैयक्तिक आयुष्याचीच चर्चा अधिक आहे. त्याचे कारणही तसेच आहे.

मराठी चित्रपट विश्वामध्ये आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण करणारी जोडी म्हणून आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेचे नाव घेतलं जाते.पण गेल्या काही दिवसांपासून या दोघांमधील वाद सगळ्यांसामोर आहेत.

टॅग्स :urmila kanetkar